म्हणून ‘या’ दिग्गज अभिनेत्याने लग्नानंतर अपत्य जन्माला ‘न’ घालण्याचा घेतला निर्णय…

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की, जे निसंतान असतात. त्यांना मूलबाळ काहीही नसते. मात्र, ते अतिशय आनंदी जीवन जगत असतात, असे असताना देखील अनेकांना असा प्रश्न पडतो की, यांना तर मूलबाळ नाही.
मात्र, हे आनंदी कसे काय जगतात. त्यावर ते त्याचे कारणही तसेच सांगतात. आपल्याला कोणी नाही, त्यामुळे आयुष्य एकदम आनंदी जगायचे. असेच काहीसे प्रकार बॉलीवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीत देखील पाहायला मिळतात. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक कलावंत आहेत की ज्यांनी आजवर लग्नच केले नाही.
यामध्ये सलमान खानचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सलमान खान सध्या पन्नाशी पार केलेला तरुणतुर्क. मात्र, त्यांनी अजून देखील लग्नाचा विचार केला नाही आणि भविष्यात तो लग्न करेल की नाही हे देखील माहित नाही.
तसेच अनेक असे जोडपे आहेत की, त्यांना मूलबाळ नाही आणि असे असले तरी ते लग्न करत नाहीत.आम्ही आपल्याला एका अशा दिग्गज मराठी व हिंदी चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याबद्दल माहिती सांगणार आहोत. या अभिनेत्याने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय का घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी मधुर भांडारकर हे नाव बॉलिवूडला नवीनच होते. मधुर भांडारकर यांनी काही वर्षापूर्वी बारगर्लच्या जीवनावर आधारित चांदनी बार हा चित्रपट केला होता. या चित्रपटात तब्बूने अफलातून अभिनय केला होता, तर अतुल कुलकर्णी याने अतिशय जबरदस्त अशी भूमिका करून सर्वांना चकित केले होते.
त्यानंतर अतुल कुलकर्णी हे नाव बॉलीवूडला परिचित झाले. त्यानंतर त्याने हे राम, सत्ता, पेज 3 यासारखे अनेक हिंदी चित्रपट केले. तसेच त्याने रंग दे बसंती यासारखे अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. अतुल कुलकर्णी म्हटले की, एकदम जबरदस्त असा चित्रपट असे समीकरण असते. मराठीत देखील त्याने अनेक चित्रपट दिले.
यामध्ये त्याचा नटरंग हा चित्रपट गाजला. तसेच इतर देखील त्याने काही चित्रपट केले आहेत. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने एक वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे हे वक्तव्य प्रचंड गाजले होते. मात्र, त्यावर खुलासा करताना अतुलने सांगितले की, मी केलेल्या वक्तव्यावर आजही ठाम आहे आणि मी माझे वक्तव्य कधीही बदलणार नाही.
लोकसंख्येबाबत बोलताना अतुल म्हणाला होता की, 2030 पर्यंत सारे काही चित्र वेगळे असेल. लोकसंख्येवर नियंत्रण मिळाले नाहीतर येत्या काही वर्षात मोठा स्फोट होईल. त्यानंतर या वक्तव्यावर चांगलाच गदारोळ माजला होता आणि सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल केले होते.
मुल न जन्माला घालण्याचा निर्णय…
अतुल यांनी मुलाखतीत सांगितले, मी एका तज्ञांचे मत ऐकले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर मोठा स्फोट होईल. अतुल कुलकर्णी यांच्या पत्नीचे नाव गीतांजली असे आहे. काही वर्षांपूर्वी ड्रामा स्कूलमध्ये दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आज त्यांच्या लग्नाला जवळपास 23 वर्षे झाली आहेत. अतुल म्हणाला, वीस वर्षांपूर्वी मी आणि माझ्या पत्नीने मिळून निर्णय घेतला की, आम्ही मूल जन्माला घालणार नाही. मूल जन्माला न घातल्याने काहीही फरक पडत नाही. यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात कमी होण्यास थोडाफार आधार लागेल.
मात्र, अतुल यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी खरपूस समाचार घेतला. अतूल म्हणाला, वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाने आम्ही आजही समाधानी आहोत. याचा आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. माझ्या गरजा कमी आहेत. त्यामुळे माझा खर्च कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.