मनोरंजन

..म्हणून इशा केसकरने सोडली ‘माझ्या नव-याची बायको’ मालिका? जाणून घ्या कारण

माझ्या नव-याची बायको’ या लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांना लवरकच जुनी शनाया पाहायला मिळणार आहे. जुनी शनाया म्हणजे अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा या मालिकेत परतणार आहे. कालच आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती दिली होती. लॉकडाऊनआधीपर्यंत इशा केसकर ही शनायाच्या भूमिकेत दिसत होती. पण आता इशा केसकरने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे तिच्या जागी रसिका परतणार आहे. आता इशा ही मालिका का सोडतेय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर खुद्द इशानेच याचे उत्तर दिलेय.
होय, इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने मालिका सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

याचे करण आहे, इशावर झालेली एक लहानशी शस्त्रक्रिया.

लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले. याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे.

‘माझ्या नवºयाची बायको’मालिका सुरु झाली तेव्हा रसिका सुनील हिने शनायाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतली होती. मात्र शिक्षणासाठी परदेशात गेल्याने रसिकाने ही भूमिका अचानक सोडली होती. तिने मालिका सोडल्याने प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली होती. रसिकाने ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा इशा केसकरने घेतली होती.

इशाने शनाया साकारताना कुठलीही कसर सोडली नव्हती. पण तिला शनाया म्हणून स्वीकारणे पे्रक्षकांना बरेच जड गेले होते. पण हळूहळू इशाला लोकांनी स्वीकारले. आता मात्र पुन्हा एकदा रसिका शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेच्या शूटींगला सुरु झाली आहे. येत्या काही दिवसांत मालिका नव्या भागांसह प्रसारित होणार आहे. या मालिकेत अभिजीत खांडकेकर,

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close