बातमीमनोरंजन

…म्हणून शाळेचा बसचा रंग पिवळाच असतो.

आपण नेहमी पाहतो की शाळेतील मुलांची ने आण करणाऱ्या बस किंवा व्हॅन यांचा रंग पिवळा असतो. पण या बस किंवा व्हॅनचा रंग पिवळा असण्यामागचे कारण असं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व प्रायव्हेट शाळांच्या बस आणि व्हॅनचे रंग हे पिवळे असावेत.

फक्त भारतातच नव्हे तर परदेशातील शाळांच्या बस ही पिवळ्या रंगाच्या असतात. परंतु शाळांच्या बस साठी पिवळ्या रंगाचीच निवड का केली असावी, असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. मग याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया.

आपण नेहमी म्हणतो की लाल रंग हा लगेच आपले लक्ष वेधून घेतो. पण लाल आणि इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग आपले लक्ष अधिक आकर्षित करतो. एका संशोधनादरम्यान लाल रंगाच्या तुलनेत पिवळा रंग हा १.२४ पट जास्त आकर्षक दिसतो.

आपण अंधारामध्ये देखील पिवळा रंग सहज पाहू शकतो. हिवाळ्यात धुक्यांमध्ये देखील पिवळा रंग आपल्या लगेच निदर्शनास येतो. १९३० मध्ये याबद्दल अमेरिकेमध्ये याबद्दल पहिल्यांदा बोललं गेलं. सुरक्षेचा हेतूने रस्त्यांवर ट्रैफिक लाइट आणि इतर गोष्टी निर्देशित करण्यासाठी पिवळा रंग वापरला जातो. धुक्याचा वेळेस आपण प्रवास करत असताना रस्ते दिसण्यासाठी पिवळा रंगाची मदत होते.

यामुळेच सुरक्षेचा हेतूने शाळेचा बस व व्हॅनचा रंग पिवळा असतो. त्यामुळे दुर्घटना व नुकसान टाळता येते. २०१२ मध्ये भारतीय हाई कोर्टाने जारी केलेल्या मार्गदर्शक धोरणांमध्ये शाळा व शाळकरी मुलांचा दृष्टीने बरेच बदल करण्यात आले होते.

सर्व स्कूल बसवर त्यांचा शाळेचे नाव व फोन नंबर लिहिले जावेत. त्यासोबत बस किंवा व्हॅनमध्ये प्राथमिक उपचार व्यवस्था असली पाहिजे. बसचा वेग निश्चित करण्यासाठी एक व्यक्ती असणे बंधनकारक आहे. बसच्या चालकाची पडताळणी होणे देखील आवश्यक आहे. जर का कोणत्याही शाळेची बस नियमांचे उल्लंघन करताना निदर्शनास आली तर त्यांचाविरुद्ध तक्रार करण्यात येईल

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close