‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…!

मोनिका बेदी एकेकाळी बॉलिवूडची मोठी अभिनेत्री होती. तिचे ‘प्यार इश्क और मोहब्बत’ आणि ‘जोडी नंबर 1’ चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. मोनिकाने काही टीव्ही शोमध्ये देखील काम केले. तसेच मोनिका बिग बॉस 2 मध्येही दिसली होती. करिअरमध्ये सर्वोच्च शिखरावर असताना तिचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले. ‘मोनिका बेदी’ यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी जोडले होते.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा अबू सालेम दोषी आहे. अबू सालेम आणि मोनिका बेदी यांच्या अफेर्सची खूप चर्चा झाली. सद्या चित्रपटांपासून दूर असलेली आणि जेलमध्ये असलेल्या अबू सलेमची काही किस्से, जाणून घेऊया. फिल्मफेअर डॉट कॉम आणि इंडिया-फॉर्म डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत स्वत: मोनिकाने स्वत: बद्दल आणि अबूच्या प्रेमकथेविषयी खुलेपणाने सांगितले. मोनिका ही एक अभिनेत्री आहे, म्हणून स्टेज शोच्या ऑफर्समध्ये तिची रुची स्वाभाविक होती. मोनिकाच्या म्हणण्यानुसार, तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलची नावे ऐकली होती परंतु, तिला अबू सालेमबद्दल माहिती नव्हते. 1998 मध्ये मोनिकाचा फोनवरून अबू सालेमशी पहिल्यांदा संपर्क झाला.
मोनिका दुबईमध्ये होती, फोनवर तिला दुबईमध्ये स्टेज शो करण्याची ऑफर मिळाली. स्टेज शो दरम्यान अबूने स्वतःला एक बिझनेसमन म्हणून वर्णन केले. शोच्या आधी अबूने त्याचे नाव बदलून तिच्याशी बोलणे सुरू केले. त्याची बोलण्याची शैली अशी होती की तिला तो पहिल्या भेटीपासून आवडू लागला. मोनिकाच्या म्हणण्यानुसार, आम्ही फोनवर बोलत होतो, पण ‘मला असं वाटायचं की आमच्यात नक्कीच काही न काही संबंध आहे. एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलताना मला तो इतका आवडेल की, त्याच्याशी न बोलल्याशिवाय राहणे कठीण होईल, याचा विचार देखील मी कधी केला नव्हता.
‘मी असे म्हणणार नाही की मी त्याच्यावर प्रेम करत होती. परंतू तो मला आवडण्याची ती सुरुवात असावी. इतका की मी दिवसभर आतुरतेने त्याच्या फोनची वाट पाहत असायची. आणि फोन आला नाही तेव्हा मी अस्वस्थ व्हायची. फोनवर बोलतांना अबू मला खूपच कुतूहलवान आणि निराश व्यक्ती वाटायचा. त्यांच्याशी बोलताना असे वाटत होते की आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. मी माझ्या सर्व गोष्टी त्याच्याबरोबर फोनवर शेअर केल्या होत्या. दुबईतील शो नंतर आम्ही दोघे इतके जवळ आलो होतो की अबू मला प्रत्येक बअर्ध्या तासाने फोन करायचा.
‘त्याने माझी खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. दुबईत दोनदा भेटल्यानंतर मी जेव्हा परत मुंबईला आली तेव्हा मी अबूला मुंबईत येण्यास सांगितले. पण तो नेहमी कारणे देत असे. अबूने मला त्याचे नाव अरसलन अली सांगितले,अबू हे नाव नेहमीच वापरत असे. आम्हाला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हासुद्धा अबूने त्याचे नाव अरसलन अली असे सांगितले. मी दुबईहून परत मुंबईला जावे अशी अबूची इच्छा नव्हती. म्हणून जेव्हा मी मुंबईत होते तेव्हा अबूने मला दुबई येथे येण्यास सांगितले आणि मी मुंबईत राहिलो तर मला त्रास होईल असे देखील त्याने सांगितले.
जेव्हा मी दुबईला पोहोचले तेव्हा त्याने मला सांगितले की आता तू परत जाऊ शकणार नाही. तो म्हणाला की, तू परत गेली तर पोलिस माझ्याबद्दल माहिती विचारतील. जग आबूला कस ओळखते माहिती नाही, परंतु मी त्याच्याबरोबर राहिले तोपर्यंत तो माझ्यासाठी सामान्य माणसासारखाच होता. तो माझ्याशी चांगला वागला. त्याने मला त्याच्यामागील अंधकार मला कधीही कळू दिले नाही. मी नेहमीच त्याला गरिबांना मदत करताना पाहिले आहे. त्याच्या भूतकाळाबद्दल मला काही माहिती नव्हती. त्याने काय चूक केली हे देखील मला माहिती नव्हते. ‘आमच्यात खूप वैयक्तिक संबंध होते. त्याचे कुणाशी काय संबंध आहे ह? मला त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. मी त्याच्याशिवाय कोणालाही भेटले नाही.
सुरुवातीच्या काळात तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे मला ठाऊक नव्हते, फक्त त्याच्या शब्द स्पर्श करून जायचे. त्याच्याबरोबर दोन-तीन दिवस राहिल्यानंतर मी प्रथमच मुंबईत परतले, तरीही त्याची माझ्याशी चांगले वागणूक होती. पण जेव्हा मी त्याच्याबरोबर राहायला लागले तेव्हा मला समजले की आम्ही एकमेकांसाठी बनलेले नाही. माझ्या लक्षात आले की आपल्या दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मग मला वाटले की मी त्याच्याबरोबर राहू शकणार नाही परंतु तो समजण्यास तयार नव्हता. आणि मग ती अपशकुन तारीख 18 सप्टेंबर 2002 रोजी आली, जेव्हा आम्हाला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आले आणि तेव्हा आम्ही विभक्त झाले. अटकेनंतर मोनिकाने तिच्या जीवनातील कडवट अनुभवांवर आधारित एका पत्रात एक कविता लिहिली.
जे अशी आहे..’छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कई काम हैं, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए’. मोनिका बेदीने आपली शिक्षा भोगल्यानंतर रुपेरी पडद्यावर परतली होती. बनावट पासपोर्टसाठी मोनिकाला दोषी ठरविण्यात आले. मोनिकाचे कुटुंब पंजाबमधील होशियारपूरहून नॉर्वे येथे गेले. मोनिका बेदी अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये म्हणाली आहे की ती अबू सालेमबरोबर बर्याच वर्षांपासून राहिली असेल, परंतु तिने अबूशी कधीही लग्न केले नाही. त्याचवेळी अबू सलेमने माध्यमांना सांगितले की 2000 मध्ये लॉस एंजेल्समधील मशिदीत त्याचे मोनिकाशी लग्न झाले होते