माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ‘या’ कलाकाराचे निधन

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ‘या’ कलाकाराचे निधन

माझ्या नवऱ्याची बायको ही टी व्ही वरील सर्वांची आवडती मालिका आहे. तसेच थोड्याच दिवसात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला चांगलाच प्रतिसाद देखील दिलेला आहेत. तसेच या मालिकेतील सर्व कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले. परंतु एक दुःखद बातमी समोर आली आहे.

या वर्षात अभिनय क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांनी जगाचा निरोप घेतलेला आहे आणि आपणही तसे ऐकत आलो आहोत. बॉलिवूड नंतर आता मराठी अभिनय क्षेत्रातील एका चांगला अभिनय करणाऱ्या कलाकाराने जगाचा नुकताच निरोप घेतला आहे. झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील एका कलाकाराच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे या मालिकेचे चाहते देखील हळहळ व्यक्त करत आहे.

या मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील अभिनेता विजय वीर यांचे निधन झाल्याचे समजते आहे.

विजय वीर हे या मालिकेत एक सहकलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे 20 जुलै रोजी रात्री 8.50 च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हॉस्पिटल मध्येच निधन झाले. या मालिकेत त्यांनी गुलमोहर सोसायटीच्या सिक्युरिटीची छोटीशी भूमिका साकारली होती .

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिका गुरुनाथ ज्या सोसायटीमध्ये राहायचे तेथील वॉचमनचा रोल करणारे विजय वीर यांचे निधन झाल्याने निधनाची ही बातमी ऐकून मालिकेतील अन्य कलाकारांना धक्का बसला आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत वॉचमनची भूमिका त्यांनी उत्तमरित्या साकारली व प्रेक्षकांनी त्या पात्राला प्रतिसाद देखील खूप दिला. या मालिके व्यतिरिक्त विजय विर यांनी लक्ष्य, रुद्रम, रंग माझ्या वेगळा या मालिकेत देखील चांगली कामगिरी केली आहे. सध्या चालू असलेली कलर्स वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत ते हवालदार माने काका यांची भूमिका साकारत होते.

शनायाची भूमिका साकारणारी ईशा केसकर हिला देखील ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. वांग्णी, मनोरी, वाडा या शॉर्ट फिल्म मध्ये देखील विजय वीर यांनी काम केले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्राने एक उत्तम अभिनेता गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *