मनोरंजन

पहा आपल्या मराठी कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार कसे दिसतात ?

चित्रपट आणि मालिकांमध्ये आपण मराठी कलाकारांना पाहत असतो. मात्र, खऱ्या आयुष्यात ते अतिशय वेगळे पहायला मिळतात. अनेकदा आपण टीव्ही किंवा चित्रपट पाहत असताना अभिनेत्रीचे किंवा अभिनेत्याचे खरे जोडीदार हे कसे दिसतात याची कल्पना करत असतो. मात्र, त्या जोडीदाराबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आम्ही आपल्याला आज मराठी कलाकारांच्या खऱ्या जोडीदाराबद्दल माहिती देणार आहोत.

१ अभिज्ञा भावे, वरूण वैतीकर : ही जोडी अतिशय ग्‍लॅमरस अशी पाहायला मिळते. सदैव एकमेकांच्या सोबत वावरताना दिसतात. या जोडीला अनेकांनी एकत्र पाहिले असेल.

२. अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर : अभिजित खांडकेकर हा सुप्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रचंड गाजली आहे त्यातील त्याने साकारलेला खट्याळ नवरा हा प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्याच्या पत्नीचे नाव सुखदा खांडकेकर आहे, ही जोडी अशी कमाल दिसते.

३. अनिता दाते, चिन्मय केळकर: माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अनिता दाते ही सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेली आहे. तिचे वैदर्भीय बोलणे सर्वांना खूप आवडते. तिचे लग्न चिन्मय केळकर यांच्यासोबत झाले असून दोघांची जोडी ग्लॅमरस वाटते.

४. अपूर्वा नेमलेकर, रोहन देशपांडे: ही जोडी देखील अतिशय कमाल असून रुपेरी पडद्यावर दोघे दिसतात. मात्र, एकत्र त्यांचे सहजीवन खूप चांगले आहे.

५. धनश्री खांडगावकर, दुर्वेश देशमुख: ही जोडी अतिशय ग्लॅमर असून आणि या जोडीची मराठी चित्रपटसृष्टीत चर्चा होत असते. धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

६. गार्गी फुले थिटे : ही जोडी अतिशय उत्कृष्ट असून या जोडीची अनेकदा मराठी चित्रपट सृष्टी चर्चा होते.

७.श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे: राहुल मेहेंदळे हा अतिशय लोभस असा अभिनेता असून त्याने अनेक चित्रपट आणि मालिका काम केले आहे. त्याची पत्नी देखील श्वेता अतिशय सुंदर आहे. दोघांची जोडी अतिशय छान आहे.

८. शिल्पा तुळसकर, विषाल शेट्टी: शिल्पा तुळसकर हिने अनेक मालिकांत काम केले आहे. तसेच तिचे काही चित्रपट देखील आले आहेत. तिने विशाल शेट्टी यांच्यासोबत लग्न केले आहे.

९.सुबोध भावे, मंजिरी भावे : सुबोध भावे हा अतिशय आघाडीचा अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटासोबत मालिकादेखील काम केले आहे. सध्या तिचे अनेक चित्रपट प्रतीक्षेत आहेत. त्याची पत्नी देखील मंजिरी भावे त्याच्यासारखीच लोभस आहे.

१०. स्पृहा जोशी, वरद लघाटे : स्पृहा जोशी हिने अनेक मालिकात काम केले असून काही चित्रपट देखील केले आहेत. काही वर्षापूर्वी तिने वरद याच्यासोबत लग्न केले आहे. ही जोडी अतिशय सुंदर आहे.

११. श्रुती मराठे, गौरव घाटनेकर: श्रुती मराठे ही अतिशय आकर्षक अभिनेत्री असून तिने मालिकांतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. काही चित्रपटात देखील काम केले आहे. तिचा विवाह गौरव घाटणेकर याच्यासोबत झाला आहे.

१२ शशांक केतकर, प्रियांका ढवळे : शशांक केतकर याने होणार सुन मी या घरची या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यानंतर त्याने तेजश्री प्रधानसोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही दिवसात त्यांचा हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर त्याने प्रियंका ढवळेसोबत लग्न केले.

१३.मृणाल दुसानीस, नीरज मोरे: तू तिथे मी या मालिकेतून सुरुवात करून मृणा ल दुसानीस हिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. मूळ नाशिकची असलेली अभिनेत्री सध्या मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकात आघाडीवर आहे. तिने नीरज मोरे यांच्या सोबत लग्न केले आहे.

१४ :प्रार्थना बेहेरे, अभिषेक जवकर : प्रार्थना बेहेरे हिने काही वर्षापूर्वी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मालिकादेखील काम केले. काही वर्षांपूर्वी तिने अभिषेक गावकर यांच्या सोबत लग्न केले.

१५.मयुरी वाघ, पियूष रानडे: मयुरी ही आजच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे. काही वर्षापूर्वी तिने पियुष रानडे यांच्या सोबत लग्न केले आहे.

१६.गिरिजा ओक, शरद गोडबोले: गिरिजा ओक हिने अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. तिने आमिर खानच्या तारे जमीपर या चित्रपटात देखील काम केले आहे. काही वर्षापूर्वी तिने शरद गोडबोले यांच्यासोबत लग्न केले आहे.

१६.मनवा नाईक, शर्व नाईक: मनवा नाईक हिने अनेक चित्रपट आणि मालिकेतून काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तिने शर्व याच्यासोबत लग्न केले आहे.

१७: स्वप्निल जोशी, लीना आराध्ये : स्वप्निल जोशी हा सध्याच्या घडीचा मराठीतील आघाडीचा अभिनेता आहे. लीना ही स्वप्नील ची दुसरी बायको असून ती औरंगाबादची रहिवासी आहे. स्वप्नील याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close