Home » मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..
मनोरंजन

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..

अशोक सराफ हे नाव तसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन नाही. अशोक सराफ यांनी आज वयाची सत्तरी पार केली असली तरी ते काही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला भेटतच असतात. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ते घरीच आराम करत आहेत.

अशोक मामा अशी ओळख त्यांना मराठी चित्रपट सृष्टीने नव्याने दिली आहे. होय अशोक सराफ यांना अनेक जूनियर अभिनेते अशोक मामा या नावाने हाका मारतात. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ सर्वांना आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळेच त्यांना मामा असे नाव सर्वांनी दिले आहे. अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या सिंघम या चित्रपटात काम केले होते.

सिंघम चित्रपटांमधील त्यांची भूमिका गाजली होती. याप्रमाणेच हजरजबाबीपणा आणि टाइमिंगमुळे ते ते सर्वत्र लोकप्रिय आहेत. आजवर त्यांनी केलेला अशी ही बनवाबनवी हा चित्रपट सर्वांनाच आठवतो. यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी अतिशय अफलातून अशी होती.

तसेच त्यांनी सचिन आणि महेश कोठारे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. अशोक सराफ यांचे मराठीतील बहुतांशी चित्रपट हे हिट झाले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेला निशाणी डावा अंगठा हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेली राठोड मास्तराची भूमिका प्रचंड गाजली होती.

अशोक सराफ यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये मराठी चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत गेल्या. आज ते एक नावाजलेले व्यक्ती म्हणून म्हणून सर्वांना परिचित आहे.

चित्रपटात यायच्या आधी करायचे बँकेत काम

होय, अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याच्या आधी अनेक ठिकाणी काम करून पाहिले होते. मात्र, त्यांना बँकेची नोकरी लाभली नाही, असे म्हणायला काही हरकत नाही. अशोक सराफ यांनी काही वर्ष बँकेत काम केले होते.

मात्र, अभिनय क्षेत्राची आवड असल्याने ते अनेकदा सुट्टी टाकून नाटक आणि इतर ठिकाणी काम करायचे. एक वेळ त्यांनी आजारी असल्याचे सांगून सुट्टी घेऊन काही महिने बँकेला दांडी मारली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी मित्र त्यांना शोधत घरी आले होते. त्यावेळी ते कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले होते.

असे असले तरी अशोक सराफ यांना सर्व सहकारी अतिशय सहकार्य करत असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या बँकेतील कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक सराफ यांनी बँकेतील नोकरी सोडून देत पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment