Magel Tyala Krushi Pump Yojana: अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यातील समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक बचत वाढवण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली जात आहेत.
मागेल त्याला कृषी पंप योजनेची सुरुवात
Magel Tyala Krushi Pump Yojana अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे, लोडशेडिंगची चिंता दूर करणे, आणि सिंचनासाठी स्वतंत्र व शाश्वत पर्याय पुरवणे हा आहे.
शेतकऱ्यांसाठी किती पैसे भरावे लागतात?
योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाची किंमत व लाभार्थ्यांचा आर्थिक वाटा पुढीलप्रमाणे आहे:
3 एचपी कृषी पंपासाठी:
- ओपन व ओबीसी प्रवर्ग: ₹19,380
- एससी व एसटी प्रवर्ग: ₹9,690
5 एचपी कृषी पंपासाठी:
- ओपन व ओबीसी प्रवर्ग: ₹26,975
- एससी व एसटी प्रवर्ग: ₹13,488
7.5 एचपी कृषी पंपासाठी:
- ओपन व ओबीसी प्रवर्ग: ₹37,440
- एससी व एसटी प्रवर्ग: ₹18,720
योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर
- शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संच व पंप फक्त 10% किंवा 5% रक्कम भरून मिळणार.
- उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळेल.
- 3 ते 7.5 एचपीचे पंप उपलब्ध.
- दिवसा वीज पुरवठा सुनिश्चित.
- वीजबिलाची चिंता नाही.
लाभार्थी निवडीचे निकष
- जमिनीचा आकार:
- 2.5 एकरपर्यंत: 3 एचपी पंप
- 2.51 ते 5 एकर: 5 एचपी पंप
- 5 एकर व अधिक: 7.5 एचपी पंप
- पाण्याचा स्रोत:
- शेततळे, विहीर, बोअरवेल, किंवा नदीजवळील शेतकऱ्यांसाठी योजना लागू.
- इतर अटी:
- मागील कृषी पंप योजनांचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
हे हि वाचा: Systematic Withdrawal Plan-SWP: SIP पेक्षा दमदार योजना, पैसे गुंतवा दर महिन्याला कमवा
मागेल त्याला कृषी पंप योजनेचे फायदे
- शाश्वत ऊर्जेचा वापर करून सिंचन.
- पाच वर्षांची देखभाल व इन्शुरन्सचा समावेश.
- लोडशेडिंग व वीजबिल मुक्त शेतीचा मार्ग.
Magel Tyala Krushi Pump Yojana शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना आहे. Saur Krushi Pump Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना भविष्यातील शेतीसाठी शाश्वत पर्याय पुरवण्यात येत आहे.
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद
शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी सौर उर्जेचा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत ११ डिसेंबरपर्यंत एकूण १,०१,४६२ सौर कृषी पंप यशस्वीरित्या बसवले गेले आहेत.
Magel Tyala Krushi Pump Yojana योजनेचा मुख्य फायदा म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरून सौर कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. महायुती सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांचे पुढील २५ वर्षांसाठी वीज बिल शून्यावर आले आहे.
हे हि वाचा:Ladki Bahin Yojana Form Status Pending: तुमचा पण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडिंग? मग हे वाचा
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या योजनेमुळे महाराष्ट्राने सौर कृषी क्षेत्रात नवा अध्याय रचला आहे. या यशस्वी उपक्रमामुळे महाराष्ट्र भविष्यातही प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
हे हि वाचा: Ladki Bahin Yojana Check Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठे जमा होतील?