लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार? ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स

लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार? ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशी स्थिती अनेकांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली असेल. लॉकडाऊनमुळे लोक सुरक्षित आपापल्या घरी आहेत. असं असलं तरी अनेकांना आपल्या प्रियजनांच्या भेटीची ओढ लागली आहे.

खासकरून तरूण मुलामुलींना आपली प्रिय व्यक्ती गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड कधी भेटेल असं झालं आहे. आज आम्ही तुम्हाला कपल्स लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात आधी काय करतील याबाबत सांगणार आहोत. खूप दिवस घरी असल्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं याचं प्लॅनिंग सगळ्यांनीच केलं आहे.

घरच्यांना भेटायला जाणं

लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या पार्टनरच्या घरच्यांना भेटता येत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात आधी कुटुंबियांना भेटून त्यांची विचारपूस करतील. त्याच्यासोबत एखाद्या ठिकाणी बाहेर जाण्याचा प्लॅन तयार करतील. लॉकडाऊन मधले आपले अनुभव शेअर करतील.

काही दिवस सुट्टी घेऊन इन्जॉय 

एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन किंवा हॉटेलमध्ये रुम बूक करून एकमेंकासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतील. काही कपल्स असे सुद्धा आहेत जे लॉकडाऊनच्या काळात घरतील कामं करून कंटाळले आहेत. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेण्यासाठी लोक बाहेर फिरायला जातील.

घरी पार्टी ठेवणं

लॉकडाऊनमुळे लोकांना नातेवाईकांच्या घरी जात येत नाही. म्हणून लॉकडाऊन संपल्यानंतर काही लोक आपल्या घरी फ्रेंड्स सोबत किंवा नातेवाईकांना बोलावून गेट टू गेदर करतील. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टेंसिंगची नियम पाळताना लोक दिसून येतील.

डिनरसाठी बाहरे जाणं

लॉकडाऊनमध्ये घरचं जेवण खाऊन अनेकांना कंटाळा आला आहे. बाहेरचं जेवण खाण्याची अनेकांची इच्छा होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स आपल्या आवडत्या ठिकाणी जेवायाला बाहेर जातील. सध्या कोरोना व्हायरसमुळे लोक खूप घाबरलेले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर काही दिवसांनी किंवा महिन्यांनी वेगवेगळे प्लॅन्स तयार करतील. 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *