Home » Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली आहे अवस्था पाहून विश्वास बसणार नाही
हटके

Lockdown : दोन महिन्यांनी दुकान उघडताच बसला धक्का, अशी झाली आहे अवस्था पाहून विश्वास बसणार नाही

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत.

कोरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. शाळा, कॉलेज, जिम, मॉल, दुकाने सर्व काही बंद आहे.

लोक बाहेर पडत नसल्यानं दुकानंही बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका शोरूममधील काही फोटो व्हायरल होत आहेत.

दावा केला जात आहे की शोरूम दोन महिन्यांनी उघडण्यात आलं असून आतलं दृश्य धक्कादायक असं होतं. लेदर प्रोडक्टचं असलेल्या शोरूममध्ये अनेक वस्तू खराब झाल्या होत्या.

एका फेसबूक युजरनं 10 मे ला फोटो शेअर करून म्हटलं की, दुकान उघडून काही फायदा नाही. कारण गेल्या दोन महिन्यांपासून दुकानात असलेला माल खराब झाला आहे.

व्हायरल होत असलेली ही पोस्ट मलेशियातील एका शोरूमची आहे. मलेशियामध्ये 18 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये थोडी सूट दिल्यानंतर दोन महिन्यांनी दुकाने उघडण्यात आली.

एका लेदर शॉपमध्ये असं दृश्य दिसलं. लोकांचं म्हणणं आहे की, दुकानातील एसी बंद असल्यानं हे झालं आहे.

दुकानातील माल पाहून असं वाटतं की दोन महिने नाही तर वर्षभरापासून हे बंद आहे. अनेक लोकांनी हे खूप दुख:द असल्याचं म्हटलं आहे.

काही लोकांनी व्यावसायिकांच्या समस्या समोर आणल्याबद्दल आभारही मानले आहेत.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment