Home » लई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी
बॉलीवूड मनोरंजन

लई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी

रितेश देशमुखच्या लई भारी चित्रपटातून अभिनेत्री तन्वी आझमी यांनी आईची भूमिका साकारली होती. तन्वी आझमी या मराठी हिंदी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. राव साहेब, डर, दुश्मन, अकेले हम अकेले तुम, मेला, बाजीराव मस्तानी यासारखे बॉलिवूड चित्रपट त्यांनी साकारले आहेत. तन्वी आझमी यांनी हिंदी सृष्टीतील सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केले.

अगदी लहान असल्यापासूनच तन्वी आझमी यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई कडूनच मिळाले होते, याबाबत अधिक जाणून घेऊयात… तन्वी आझमी या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “उषा किरण” यांच्या कन्या आहेत. एक देखण्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून उषा किरण या सृष्टीत ओळखल्या जात असत.

उषा किरण यांचे खरे नाव उषा मराठे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांची मोठी बहीण लीला मराठे यांना नाटकांतून काम करण्यास सांगितले. इथूनच उषा किरण यांना कुबेर या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

नृत्य शिकण्यासोबतच त्यांनी हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, इंग्रजी अशा विविध भाषा आत्मसात केल्या. मायाबाजार चित्रपटातली त्यांनी साकारलेली रुख्मिणी त्याकाळी खूपच लोकप्रिय ठरली होती. जशास तसे, सात जन्माची सोबत, गरिबाघरची लेक, एक धागा सुखाचा, शिकलेली बायको, पुनवेची रात, माणसाला पंख असतात अशा मराठी चित्रपटातून त्यांची लोकप्रियता वाढत

असतानाच हिंदी सृष्टीतील देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर अशा अनेक दिग्गजांसोबत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पतित, दाग, नजराणा, बावरची, चुपके चुपके, मिली अशा ५० ते ७० च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटातून प्रमुख नायिका तर कधी सह अभिनेत्री साकारली.

१९५४ साली उषा किरण या डॉ मनोहर खेर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. त्यावेळी डॉ मनोहर खेर हे मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे डीन होते. चित्रपटातून संन्यास घेतल्यावर उषा किरण यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. इथेच मुंबईच्या लोकपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला. ९ मार्च २००० रोजी कॅन्सरने उषा किरण यांचे निधन झाले.उषा किरण यांना तन्वी आझमी आणि अद्वैत खेर ही दोन अपत्ये.

अद्वैत खेर नाशिकला स्थायिक असून एक मॉडेल म्हणूनही ते नावारूपास आले होते. १९८२ साली फेमिना मिस इंडिया चा मान मिळवलेल्या उत्तरा खेर या त्यांच्या पत्नी. संस्कृती आणि संयमी या दोन मुली त्यांना आहेत.

त्यापैकी “संयमी खेर” हिने आपली आत्या आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत रितेश देशमुख सोबत ‘माऊली’ चित्रपटातून मराठी सृष्टीत पदार्पण केले. तेलगू, मराठी ,हिंदी असे बहुभाषिक चित्रपट साकारणारी संयमी खेर लवकरच हॉटस्टारच्या “ओप्स” या वेबसिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment