मनोरंजन

कोट्यावधी रुपयांचा मालक तरी घरात नाही सोफा, एसी आणि इतर मौल्यवान वस्तू..जाणून घ्या कोण आहे ‘हा’ अभिनेता..

सध्याच्या जमान्यामध्ये आपण छोट्या झोपड्यात जरी गेलो तरी त्याच्या घरामध्ये एसी, फ्रीज, टीव्ही, कुलर आणि सर्व आरामदायी वस्तू आढळतात. काही वर्षापूर्वी या चैनीच्या वाटणार्‍या वस्तू आज सहज उपलब्ध होतात. काही वर्षांपूर्वी टीव्ही घेण्यासाठी एक वर्ष आधी नंबर लावावा लागायचा. त्यानंतरच हा टीव्ही संबंधीत त्याच्या घरी नायचा.

तसेच इतर मौल्यवान वस्तूचे देखील असेच होते. फ्रिज घ्यायचे झाले असल्यास सर्व पैसे नगदी द्यावे लागायचे. तसेच टीव्हीसाठी नियम होता. कोणता टीव्ही पाहिजे त्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागत होती. त्यानंतर उर्वरित टीव्ही घेऊन जाताना ते पैसे द्यावे लागायचे. कुलरबाबत देखील असेच होते. मात्र, आता या वस्तू इलेक्ट्रॉनिक दुकानातून घरी घेऊन जायच्या आणि पैसे नंतर द्यायचे असा ट्रेंड रुजू झाला आहे.

आता या वस्तू सहजगत्या मिळतात. मात्र, या जगामध्ये काही अशी व्यक्ती आहेत की, या सर्व सुख-सुविधा पासून ते दूर राहतात. यामध्ये काही मोजकेच व्यक्ती आहेत, ज्यांना खर्चासाठी काहीही लागत नाही किंवा आरोग्याच्या बाबतीतही सजग राहण्यासाठी हे व्यक्ती चैनीच्या वस्तू वापरत नाहीत.

आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये अशाच एका मराठी अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत गाजवून सोडली आहे. मात्र, तरी देखील त्याच्या घरात चैनीच्या वस्तू या अजिबात नाहीत. कोण आहे तो अभिनेता आम्ही सांगणार आहोत.

काही वर्षांपूर्वी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरू केली काही नाटकं केली. त्यानंतर हिंदीत देखील चांगल्या ऑफर चालून आल्या. हे राम, चांदनी बार, पेज थ्री, सत्ता मराठीमध्ये नटरंग आणि इतर चांगले दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. होय आम्ही बोलत आहोत अभिनेता अतुल कुलकर्णी याच्याबद्दल….

अतुल कुलकर्णी यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, माझ्या घरी सोफा, केबल, एसी आणि इतर मौल्यवान वस्तू कुठल्याही नाहीत. केवळ माझ्या घरी फ्रिज आणि मिक्सर मात्र आहे. कारण माझ्या आईला त्याचा वापर करावा लागतो, म्हणून तो मी घेतला आहे. टीव्ही मोठा आहे.

मात्र, केबल नाही. टीव्हीवर मी मोबाईलवरील चित्रपट वगैरे पाहू शकतो. माझ्या घरी सोफा देखील नाही. सोफा नसण्याचे कारण म्हणजे माणूस बाहेरून आल्यावर लगेच सोफ्यावर बसतो. याउलट सोपा नसेल तर खाली मांडी घालून बसावे लागते आणि यामुळे व्यायाम होतो. त्यामुळे या वस्तू मी घरात आणल्या नाहीत.

तसेच माझ्या घरात बेडदेखील नाही. मी चटईवर झोपतो, असेही त्याने एका मुलाखतीत सांगितले. बेडवर झोपल्याने तुम्हाला आरामदायी वाटत असेल. मात्र, मी हार्ड बेड घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे हे म्हणणे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल की, कोट्यवधी रुपये कमावणारा हा अभिनेता किती साधा आणि सरळ आहे.

त्याच्या मते या वस्तू आयुष्यासाठी काहीही गरजेच्या नाहीत. या केवळ चैनीच्या वस्तू आहेत. त्यामुळे माणसाची गरज ही फार कमी आहे. उगाच त्याचा बाऊ करू नये, असे त्याचे म्हणणे होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close