असा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा

असा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण  शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा

अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे समीकरण आता जणू बॉलीवूडमध्ये परिचित झाले आहे. कंगना राणावत म्हटले की वाद असे चित्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. गेल्यावर्षी कंगना हिचा ह्रितिक रोशनसोबत झालेला वाद हा चांगलाच गाजला होता. मात्र, कालांतराने रितिक रोशन याने पुढाकार घेऊन हा वाद मिटवला.

मात्र, हे प्रकरण जवळपास दोन वर्ष सुरू होते. रोज कंगना आणि ह्रितिक एकमेकांवर आरोप करत होते. क्रिश चित्रपटाच्या वेळी कंगना आणि ह्रितिकमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा होती. मात्र, यानंतर कांगणाने पत्रकार परिषद घेऊन ऋतिकसोबत आपले प्रेम प्रकरण असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र, नंतर हा वाद संपुष्टात आला. कंगना राणावत हिने गँगस्टर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात कंगनाने अतिशय चांगली भूमिका केली होती.

या चित्रपटातील गाणी देखील खूप सुमधुर होती. त्यानंतर तिने व लम्हे, लाईफ इन मेट्रो, फॅशन, क्रिश 3, क्वीन, तनु वेड्स मनु, पंगा या चित्रपटातून काम केले. कंगना हिने नुकतीच एक मुलाखत दिली असून तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल अनेक बाबींचा खुलासा केला आहे. आपले पहिले प्रेम, पहिल्या चुंबनाचा अनुभव आणि इतर गोष्टी सांगितल्या आहेत.

शिक्षकावर होते पहिले प्रेम

कंगना राणावत हिचे पहिले प्रेम तिचे शाळा शिक्षक होते. ती म्हणाली, मी ज्यावेळी नववीत होते, त्यावेळी शिक्षकावर प्रेम जडले होते. त्यावेळी एक गाणं प्रदर्शित झालं होतं ‘चांद छुपा बादल में’ कंगना घरी आल्यावर ओढणी घेऊन आपल्या शिक्षकाला इमॅजिन करत असे. कंगना सांगते, जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुमचं मन शिक्षक किंवा इतरांत गुंतंत असते.

पहिल्या चुंबनाचा अनुभव

आपल्या पहिल्या चुंबनाचा अनुभवाबद्दल कंगना म्हणाली, मी किस करण्यापूर्वी माझ्या हातावरच किस करण्याची प्रॅक्टिस केली होती. लोकांचं पहिलं किस मॅजिकल असतं. पण माझ्याबाबत असं काहीही घडलं नाही.

माझं पहिलं किस खूप विचित्र होतं. तो अनुभव खूपच वाईट होतं. मी एका जागी फ्रिज झाले होते आणि त्या जागेवरून हलू सुद्धा शकत नव्हते. मात्र तिने हा किस कोणला दिला हे नाही सांगितले.

रितिक रोशन बाबत..

या मुलाखतीत कंगनाला हृतिक रोशनसंबंधीत प्रश्न विचारण्यात आला. जर तु एका सकाळी हृतिक रोशन म्हणून उठलीस तर काय करशील? यावर कंगनानं उत्तर दिलं. ‘,मी हृतिक म्हणून उठले तर मी सर्वात आधी कंगनाला फोन करुन तिला सॉरी बोलेन. तिला सांगेन तुझ्याशी मी खूप वाईट वागलो आहे. मला माफ कर’

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *