हीट चित्रपट देऊनही ‘हे’ कलाकार कुठे गेले?, सध्या कुठेच दिसत नाहीत..जाणून घ्या..

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणातच हिट चित्रपट देऊन त्यानंतर काही जणांच्या पदरी यश मिळते तर काही जणांच्या पदरी अपयश येते. काही बालकलाकार देखील चांगली चित्रपट देऊन नंतर कुठे जातात ते समजतच नाही.
आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये अशाच काही कलाकारांबाबत सांगणार आहोत की, त्यांनी सुरुवातीला काही चांगले चित्रपट दिले. मात्र, त्यानंतर ती सध्या काय करतात हे काहीही माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया आपण या कलाकारांबद्दल….
1. गौरी वैद्य : काही वर्षांपूर्वी आलेला ‘दे धक्का’ चित्रपट आपल्याला आठवत असेल. या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे यांच्या मुलीची भूमिका करणारी ही अभिनेत्री होय. चित्रपटात तिने सायली नामक पात्र चांगलेच गाजवून सोडले होते. या अभिनेत्रीचे नाव आहे गौरी वैद्य.
दे धक्का चित्रपट केल्यानंतर तिने शिक्षणाचा आयचा घो हा चित्रपट केला. मात्र, त्यानंतर ती कुठे गायब झाली, तेच कळत नाही. ती सध्या डि जी रुपारेल कॉलेजमधून इंजिनिअरिंग करत असल्याचे सांगण्यात येते. तसेच ती नाटक आणि इतर कार्यक्रमात काम करत असल्याची देखील माहिती आहे.
2.सक्षम कुलकर्णी : दे धक्का या चित्रपटात गौरी वैद्यसोबत दिसलेला हा पहिलवान मुलगा चांगलाच गाजला होता. त्यानंतर सक्षम आणि नाना पाटेकर यांच्यासोबत पक पक पकाक तसेच भरत जाधव यांच्यासोबत शिक्षणाचा आयचा घो या चित्रपटात काम केले होते. गौरी आणि सक्षम यांनी एकत्र चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याने एक वेब सीरीज देखील केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मात्र सक्षम चित्रपटात दिसलाच नाही.
3.मृण्मणी लागू : प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांची ही कन्या होय. काही वर्षांपूर्वी रिमा यांचे निधन झाले होते. मृण्मयी हिने काही वर्षांपूर्वी नाटक आणि मालिकांमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मृण्मयीने मकरंद अनासपुरे व प्रसाद यांच्यासोबत दोघात तिसरा आता सगळ विसरा या चित्रपटात काम केले.
त्यानंतर ती आमिर खानसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून देखील काम केल्याचे सांगण्यात येते. तिने दंगल, थ्री इडीयट्स, तलाश, पिके या चित्रपटात आमीरला साहाय्य केल्याचे सांगण्यात येते. तसेच तिने हॅलो जिंदगी या मालिकेतील काम केले. सध्या ही अभिनेत्री मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्यास पुढे धजावत नाही.
4. राधिका आपटे : ही अतिशय बोल्ड असणारी मराठी अभिनेत्री प्रचंड गाजली आहे. तिने रितेश देशमुख सोबत लय भारी या चित्रपटात काम केले होते. तसेच तिने हिंदी चित्रपट देखील काम केले आहे.
काही वेब सीरीजमध्ये काम करून तिने आपला बोल्डपणा दाखवून दिला आहे. समांतर, तुकाराम या मराठी चित्रपटात तिने काम केले. तसेच काही बंगाली मालिकादेखील काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कुठे दिसत नाही.
5. नारायणी शास्त्री : ही देखील अतिशय ताकदीची असलेली अभिनेत्री आहे. तिने दे धक्का या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘क्यू की सास भी कभी बहू थी’ संजीवनी यासारख्या मालिकांत काम केले सध्या मात्र ती कुठे दिसत नाही.