मनोरंजन

हा मुस्लिम अभिनेता महाभारतातील अर्जुनाच्या भूमिकेमुळे झाला प्रसिद्ध

लॉक डाऊनलोडमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. हीच संधी साधून अनेक टीव्ही चॅनलने जुन्या मालिका नव्याने सुरू केल्या आहेत. याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या मालिकांचे चित्रीकरण गेल्या काही दिवसापासून बंद आहे. अशा मालिकांनी काही दिवसांचे भाग चित्रित करून ठेवले होते.

मात्र, आठ दिवस सुरू राहतील एवढेच भाग शिल्लक होते. त्यामुळे सध्या डी डी नॅशनलवर महाभारत, रामायण सुरू झाले आहे. या मालिकेत काम करणारे सर्व कलाकार त्यावेळी गाजले होते. महाभारतातील कलाकाराविषयी नवीन पिढी पुन्हा नव्याने माहिती घेत आहे.

महाभारतातील कृष्ण, अर्जुन यांचे पात्र खूप गाजले होते. तसेच दुर्योधन, द्रोपदी यांचे पण पात्र चांगलेच गाजले होते. मात्र, यात काम करणारा एक अभिनेता चांगलाच भाव खाऊन गेला होता. आज त्याच अभिनेत्याविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

फिरोज खान आहे नाव

महाभारतामध्ये अर्जुनाचे पात्र सुरुवातीला जॉकी श्रॉफ यांच्याकडे आले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी हे पात्र केले नाही. त्यानंतर हे पात्र फिरोज खान या मुस्लिम अभिनेत्याकडे आले होते. एका मुलाखतीमध्ये फिरोज खान यांनी या पत्राविषयी अधिक माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

महाभारतातील भूमिकेविषयी फिरोज खान म्हणतात, सुरवातीच्या काळात मला अजिबात काम मिळत नव्हते. त्यामुळे मी सर्वत्र ऑडिशन देत होतो. महाभारताची ऑडिशन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी निर्मात्यांना फोन करून सांगायचो की, मी फिरोज खान बोलतोय.

त्यानंतर ते प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान असल्याचा समज करून मला बोलायचे. मात्र, आपण खरे फिरोज खान नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा भ्रमनिरास होत. असे बरेच दिवस गेले. मात्र, मला काही कामं मिळाले नाही. त्यानंतर मालिकेचे निर्माते चोप्रा यांनी मला नाव बदलण्यास सांगितले.

त्यानंतर मी माझे नाव बदलून अर्जुन असेच ठेवले मालिकेत देखील अर्जुनाची भूमिका करायची होती. त्यानंतर हे नाव आणि पात्र येवढे गाजले की यामुळे मला आज प्रसिद्धी पैसा सर्व काही मिळाले आहे. त्यामुळे आता देखील मी माझ्या नावासमोर अर्जुन असे लावतो. या मालिकेमुळे माझे जीवनमान बदलले. त्यामुळे हे पात्र मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

आईदेखील म्हणायची अर्जुन

ही मालिका टीव्हीवर दाखवायला सुरूवात झाल्यानंतर फिरोज खान हे नाव घराघरात पोचले होते. मात्र, त्याला फिरोज खान नावाने कोणीही ओळखायच नाही. त्याला अर्जुन असे संबोधायचे. मालिका सुरू झाल्यानंतर फिरोज खान यांची आई देखील त्याला घरात अर्जुन असेच म्हणत होती, असेही फिरोज खान यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close