बापरे ! एका महिन्याचा इतका खर्च होता सुशांतसिंग राजपुतचा, मॅनेजरने सांगितली आर्थिक परिस्थिती

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये अनेक खुलासे होत आहेत सुशांतच्या एक्स मॅनेजर श्रुतीने पोलिसांना सांगितले की सुशांतसिंग राजपूतची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्याने दरमहा किमान 10 लाख रुपये खर्च केले. त्यांच्या घराचे भाडे 4,50,000 इतके होते.
याशिवाय त्यांनी लोणावळ्यातील पवना धरण येथे फॉर्म हाऊसही भाड्याने घेतला होता, त्याचे भाडेही लाखोंमध्ये होते. सुशांतला वाहनांची फार आवड होती .त्याकडे अनेक परदेशी वाहने होती. श्रुती सुशांतबरोबर जुलै 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत काम करत होती आणि श्रुतीने सांगितले की सुशांत काही काळ चार प्रकल्पांवर काम करत होता.
पोलिस अद्याप सुशांतसिंग राजपूतच्या निधनामागील कारण शोधत आहेत. गुरुवारी रिया चक्रवर्ती पीआर मॅनेजर राधिका निहलानी यांच्याशिवाय पोलिसांनी श्रुतीचीही निवेदने नोंदविली आहेत.