देवेंद्र यांचा नारा ‘मी पुन्हा येईन’ त्यावर जयंत पाटील म्हणाले….

देवेंद्र यांचा नारा ‘मी पुन्हा येईन’ त्यावर  जयंत पाटील म्हणाले….

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजप नेते सध्या विविध वक्तव्य करून नाहक वाद ओढावून घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार फेसबुक लाईव्ह आले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. याचाच परिणाम म्हणून त्यांना अर्ध्यातून फेसबुक लाईव्ह सोडून जावे लागले होते.

त्यानंतर असाच काहीसा प्रकार विनोद तावडे यांच्या बाबतीतही झाला होता. सध्या नागरिक भाजपच्या लोकांना सळो की पळो करून सोडत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने एकत्र लढण्याची घोषणा केली. त्यानंतर दोघांनी एकत्र प्रचारही केला. भाजपच्या शंभरहून अधिक जागा आल्या. तर सेनेला पन्नास पेक्षा अधिक जागा मिळाल्या.

मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री पद ठरल्याप्रमाणे आपल्याला देण्याची मागणी सेनेने केली. भाजपने मात्र असे काहीही ठरले नसल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. यानंतर सरकार स्थापन होत नाही, असे दिसताच सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

त्यानंतर तीन पायाचे हे सरकार दोन महिन्यात पडेल, असे अनेकांनी सांगितले. मात्र, सरकार सहा महिने पूर्ण करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता त्याला निवडणूक आयोगाने देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक लवकर होणार आहेत.

त्याचे शल्य सध्या विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाल्याचे दिसत आहे. एका मुलाखती त फडणवीस म्हणाले की, राज्यात आम्ही 144 जागा जिंकल्या असत्या. त्यावेळी आम्ही सेनेचा प्रचार केला. मात्र, आमच्या प्रचाराला शिवसेनेचा एकही नेता आला नाही.

त्याच वेळी आमच्या लक्षात आल होत यामागे काहीतरी शिजत आहे. राष्ट्रवादीसोबत सेनेचे काही तरी आधीच ठरले होते, असा आरोपही त्यांनी केला. तसेच या तिन्ही पक्षांना जनता चांगला धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

‘मी पुन्हा येईन’ चा दिला नारा

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय आक्रमकपणे प्रचार केला. तसेच या प्रचारादरम्यान त्यांचा ‘मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल’ हा डायलॉग एवढा गाजला की अक्षरशः देशांमध्ये याची चर्चा झाली. सोशल मीडियावर देवेंद्र यांना अनेकांनी ट्रोल केले. तसेच अनेक ठिकाणी याबाबत संदेशही जाऊ लागले. त्यामुळे मी पुन्हा येई न, असे म्हटले की, हसू येऊ लागले.

आता हे वाक्य महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिले गेले आहे. फडणवीस म्हणाले की, योग्य वेळी जनता आम्हाला राज्याच्या सत्तेवर आणेल. याबाबत आमच्या मनात शंका नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जयंत पाटील यांनी टीका करून देवेंद्र तुम्हाला आता संधी मिळणार नाही, असे सांगत तुम्ही विरोधातच बसा असे म्हणाले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *