बॉलीवूड

दीपिकानं शेअर केला व्हाट्सएपचा स्क्रीनशॉट; पाहा फॅमिली ग्रुपमध्ये कसा वागतो रणवीर

बॉलिवूडचं क्यूट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतं. सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रणवीर आणि दीपिकाची नटखट मस्ती सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. हे दोघंही या लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अशात आता दीपिकानं तिच्या फॅमिली ग्रुपचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यात तिनं फॅमिली ग्रुपवर रणवीर कसा वागतो हे सांगितलं आहे.

लॉकडाऊनमध्ये दीपिकानं शेअर केलेला हा फॅमिली ग्रुपचा स्क्रीनशॉट खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत दीपिकानं लिहिलं, पाहा कुटुंब असं चालतं. यामध्ये दीपिकाची आई रणवीरचं त्याच्या मुलाखतीसाठी कौतुक करताना दिसत आहे.

यासोबतच रणवीरच्या वडीलांनीही त्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट या फोटोमधून समोर आली ती म्हणजे, दीपिकानं तिच्या फोनमध्ये रणवीरचं नाव हॅन्डसम म्हणून सेव्ह केलं आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत दीपिकानं सांगितलं होतं की, रणवीरला तिची सतत काहीतरी करत राहण्याची सवय अजिबात आवडत नाही आणि याबाबत त्यानं फॅमिली ग्रुपमध्ये तिची तक्रार सुद्धा केली होती. काही दिवसांपूर्वी दीपिकाची साफसफाई करताना पाठ दुखू लागली होती. तेव्हा रणवीरनं तिला आराम करायला सांगितलं मात्र काही वेळानंतर जेव्हा तो व्यायाम करून घरी आला तेव्हा दीपिका पुन्हा काम करत होती.

दीपिकाच्या या सतत काहीतरी करण्याच्या सवयीला कंटाळून रणवीरनं तिची फॅमिली ग्रुपमध्ये तक्रार केली होती. दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती सध्या तिच्या इंटर्न सिनेमाच्या प्रोजेक्टवर काम करत आहे.

याशिवाय ती रणवीर सोबत ’83’ सिनेमात दिसणार आहे. लग्नानंतर या दोघांचा हा एकत्र पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close