चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेतले. त्यात सर्वात मोठं उदाहरण म्हणजे किंग खान म्हणजेच शाहरुख खान, शाहरुख खान जेव्हा मुंबई मध्ये त्याच नशीब आजमवण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्याकडे करत जायला पैसे देखील नव्हते. त्यामूळे त्याने काही दिवस रेल्वे स्टेशनवरच काढले. पण आज शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो.
पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिने फक्त तिच्या आर्थिक अडचणींमुळे चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आता अब्जावधी रुपयांची ती मालकीण बनली आहे.
या अभिनेत्रीचे नाव सामन्था रुथ प्रभु (समांथा अक्किनेनी) आहे, जी आता दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिने आतापर्यंत बर्याच सर्वोत्कृष्ट तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘रंगास्थलम’ आणि ‘मर्शल’ अशा त्यांच्या बर्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.
सामन्था रुथ प्रभुचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ती साउथ फिल्म्समधील यशस्वी आणि सुपरस्टार नागार्जुनाचा मुलगा ‘नागा चैतन्यची’ पत्नी आहे. सन 2017 मध्ये सामन्था आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना आपले जोडीदार बनविले.
मिळालेल्या माहितीनुसार अडचणींमुळे सामन्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक काळ असा होता की सामन्थाकडे चहा प्यायला देखील पैसे नव्हते आणि आता फिल्म इंडस्ट्रीत तीने केलेला संघर्ष आणि मेहनतीमुळे सामन्था आज अब्जावधी रुपयांची मालकीण बनली आहे.
तिच्याकडे जवळपास 3 अब्ज इतकी संपत्ती आहे. याशिवाय सामन्थाकडे महागडे मेकअप सेट आहेत, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. याशिवाय तिच्याकडे महागड्या कार देखील आहेत त्यात, जग्वार, ऑडी आणि पोर्श यासारख्या महागड्या वाहनांची मालकी समांथाकडे आहे.
Add Comment