बॉलीवूड

‘बेफिक्रे’मध्ये रणवीरने २३ वेळा दिलेल्या किसिंग सीनवर; दीपिका म्हणाली असे काही, वाचून थक्क व्हाल !

अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला बेफिक्रे हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाची त्यावेळी प्रचंड चर्चा रंगली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा यांनी चौकटीबाहेरच्या कथानकाला हात घालण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शन क्षेत्रात एक नवा प्रयोग केल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटातील रणवीर आणि वाणी यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात रणवीर आणि वाणी यांचे तब्बल २३ वेळा चुंबनदृश्य दाखविण्यात आले होते. त्यामुळे हे सीन पाहिल्यानंतर दीपिकाची पहिली प्रतिक्रिया काय होती हे समोर आलं आहे.

दीपिका आणि रणवीर एकमेकांचे पती-पत्नी असण्यासोबतच त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचंही अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या दोघांनीही एकमेकांना प्रोफेशनल लाइफमध्ये आवश्यकती सूट दिलेली आहे. त्यामुळे ‘बेफिक्रे’मध्ये रणवीरचे चुंबनदृश्य पाहिल्यानंतर दीपिकाने दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बदला.

“जर चित्रपटाच्या स्क्रिप्टची ती गरज असेल तर हे सारं करावंच लागेल. हा कामाचा एक भाग आहे. तसंच रणवीर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देतो, यावर माझा कोणताही आक्षेप नाही. कारण मी देखील त्याकडे कामाचा एक भाग म्हणून पाहते.

मीदेखील काही चित्रपटांमध्ये असे सीन दिले आहेत”, असं उत्तर दीपिकाने दिलं होतं. दरम्यान, दीपिका आणि रणवीर हे कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहे. लवकरच ही जोडी ’83’ या आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close