अरुण गोविल म्हणतात, रामायणातील ‘हा’ सिन शूट करणे माझ्यासाठी खूप अवघड होते

दूरदर्शन या सरकारी वाहिनीवर सध्या रामायण ही मालिका अखेरच्या भागात आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या उत्तर रामायण सुरू आहे. रामायणामध्ये जेवढ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या तेवढ्या सर्वांच्या भूमिका त्याकाळी प्रचंड गाजल्या होत्या.
तसेच आतादेखील सर्व अभिनेत्यांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. अरुण गोविल दीपिका चिखालिया या आणि इतर अभिनेत्यांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. सध्या लोकांना घरी बसून काय करावे, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अनेक जण आपले छंद जोपासत आहेत. तर अनेक जण सध्या रामायण, महाभारत या मालिका पाहत आहेत.
रामायणात काम करणारे अनेक कलाकार यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. रामायणातील मुख्य पात्र साकारणारे अरुण गोविल सध्या ट्विटर’वर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
अनेक जण त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत. तसेच अरुण गोविल देखील त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. रामायण ही मालिका अतिशय भ्यव दिव्य असल्याने यातील अनेक सीन हे करणे अनेकांसाठी कठीण झाले होते.
मात्र, अरुण गोवि ल यांनी हे सीन अतिशय चंगल्या पद्धतीने केले. मात्र, अनेकांना काही सीन करण्यामध्ये मोठी अडचण येत होती. मात्र, रामानंद सागर यांनी सर्वाकडून चांगले सीन करून ही मालिका अतिशय चांगल्या पद्धतीने केली. त्यानंतर या मालिकेतील एकेक दृश्य अतिशय लोकप्रिय झाले.
हा सीन करणे होते कठीण
रामायणामध्ये अनेक असे प्रसंग आहेत जे भाविक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांमधून अश्रू काढतात. तसेच यातील काही हृदयस्पर्शी सिन आजही लोकांच्या मनात घर करून बसले आहेत. एका चाहत्याने अरुण गोविल यांना ट्विटरवर विचारले, रामायणात सर्वात कठीण सीन कोणता होता.
त्यावर अरुण गोविल यांनी सांगितले की, राजा दशरथ म्हणजेच रामाचे वडील यांचा मृत्यू झालेला सीन करणे फार कठीण होते. ज्यावेळी आपल्याला ही बातमी समजते त्या वेळी आपण कसे रिऍक्ट करायचे हे आपल्याला समजत नव्हते. मात्र, काही शॉट पूर्ण केल्यानंतर आपण हा सीन पूर्ण केला.
हा सीन एवढा दर्जेदार झाला की टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. जुनी माणसे आजदेखील हा सीन पाहून पुन्हा एकदा भावनिक झाल्याचे पाहायला मिळते. यामुळेच या मालिकेची लोकप्रियता पुन्हा एकदा दिसून येते, असेही गोविल यांनी सांगितले. सध्या आपण घरीच असल्याचे देखील ते म्हणाले.