Home » लॉकडाउनमध्ये ६३ वर्षांच्या अनिल कपूरने बनवली तरुणांना लाजवेल अशी बॉडी
मनोरंजन

लॉकडाउनमध्ये ६३ वर्षांच्या अनिल कपूरने बनवली तरुणांना लाजवेल अशी बॉडी

करोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. करोनाचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

त्यामुळे सर्व कलाकार सध्या घरात बसून कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असून आवडीची कामे करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा फोटो व्हायरल झाला आहे.

नुकताच अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना संदेश देखील दिला आहे. ही पोस्ट करण्यामागचे कारण शो ऑफ करणे किंवा स्वत:ची प्रशंसा करणे असा नाही.

पण तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की अशी बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंटवर पैसे खर्च करावे लागत असतील. तर असे नाही. मी बॉडी बनवण्यासाठी कोणतीही सप्लीमेंट घेतलेली नाही. मी गेल्या ६ वर्षांपासून बॉडी बनवण्याचा विचार करत आहे.

पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मला करायला जमत नव्हते. पण मी तुम्हाला इतकच सांगेन की सध्याच्या परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्टी केल्या पाहिजेत असे अनिल कपूरने फोटो शेअर करत म्हटले आहे.

सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा हा 30 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. तर मृतांची संख्यांही ८०० च्या वर गेली आहे.

तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठाने करोना प्रतिबंधासाठी जी लस विकसित केली आहे, त्याचे उत्पादन पुढील दोन ते तीन आठवड्यात आम्ही सुरू करू.

मानवी वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्या तर ही लस सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असे पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment