अभिषेक बच्चन होता ‘या’ अभिनेत्याचा ड्रायव्हर, स्ट्रगलदरम्यान स्टुडिओमध्येही केली आहे साफसफाई

अभिषेक बच्चन होता ‘या’ अभिनेत्याचा ड्रायव्हर, स्ट्रगलदरम्यान स्टुडिओमध्येही केली आहे साफसफाई

अभिषेक बच्चन भले ही सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे मात्र तरीही त्याचा बॉलिवूडमधील प्रवास हा सोपा नव्हता. अभिषेकने 2000मध्ये आलेल्या रिफ्युजी सिनेमातून करिना कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

या सिनेमातून पदार्पण करण्यापूर्वी पडद्याच्या मागे अनेक काम केली. अभिषेकने 2 वर्ष सिनेमाच्या प्रॉडक्शन टीमसोबत काम केले. यादरम्यान तो चहा बनवायचा, स्टुडिओमधील फरशीसुद्धा साफ करायचा ऐवढेच नाही तर अर्शद वारसीचा ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम केले आहे

जेव्हा एकामागोमाग एक सिनेमा फ्लॉप व्हायला लागले तेव्हा घरातून बाहेर पडावंस वाटायचे नाही. मी आरशावर खराब सिनेमाचे परीक्षण चिकटवायचो आणि त्यागोष्टींवर काम करायचो.

‘गुरू’ हा अभिषेकच्या दमदार अभिनयाचा परिचय देणारा असाच एक चित्रपट. हा चित्रपट अभिषेकच्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट मानला जातो. या चित्रपटासाठी अभिषेकला फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. ‘युवा’ या चित्रपटात अभिषेकने साकारलेला लल्लन सिंह अफलातून होता.

हे निगेटीव्ह कॅरेक्टर अभिषेकने इतक्या ताकदीने पडद्यावर साकारले की, त्याच्या भूमिकेचे अपार कौतुक झाले. या चित्रपटासाठीही अभिषेकला फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाला. ‘सरकार’ या चित्रपटातही अभिषेकने आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवत, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. लवकरच तो ‘बॉस बिस्वास’ या सिनेमात दिसणार आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *