मनोरंजन

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो ?

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो.

तसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. प्रसादची पत्नी मंजिरी ओकही सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपले कुटुंबासोबतचे फोटो ती शेअर करत असते. मंजिरी एखाद्या अभिनेत्री इतकीच दिसायला सुंदर आहे.

मंजिरी आणि प्रसादचे लव्ह मॅरेज झाले आहे. 1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पार्टीच्या ठिकाणी मंजिरी नेहमीच प्रसादसोबत दिसते.

हिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे. प्रसादच्या संघर्ष काळात ती प्रसादच्या मागे सावली सारखी उभी होती.


मंजिरीच्या सांगण्यावरुन प्रसादने कायमस्वरुपी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या या यशात पत्नी मंजिरीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close