मनोरंजन

मराठी अभिनेत्र्यांनाही लाजवेल ‘इतकी’ सुंदर आहे आदर्श शिंदेची पत्नी, पहा फोटो…

आनंद शिंदे यांचे सुपुत्र आदर्श शिंदे हे आज मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. त्यांचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. आदर्शला गाण्याचे धडे घरातूनच मिळाले असले तरी त्यांनी त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे वडील आनंद शिंदे हे मराठी भावगीत, भक्तिगीत आणि भीम गीतांसाठी प्रसिद्ध आहेत. मराठीतील नव्या दमाच्या गायकांमध्ये आदर्श शिंदे आज परिचीत आहे.

आदर्शचे आजोबा प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली विठ्ठलाची भक्तीगीते आजही घराघरात वाजत असतात. आजोबा आणि वडिलांप्रमाणेच आज भारतातच नाही तर, परदेशातही आदर्शचे चाहते आहेत.

”देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही”… या गाण्याने आदर्शला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. आदर्शही इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर चाहत्यांसह संवाद साधत असतो. नवीन नवीन अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतो.

त्यांचे खास फोटो तो शेअर करत असतो. त्याच्या सोशल मीडियापेजवर नजर टाकली तर तुम्हाला त्याच्या पत्नीसह त्याने घालवलेले खास क्षणांचेही फोटो पाहायला मिळतील.

नेहा लेले असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. मुळात दोघांचेही लव्ह मॅरेज आहे. एकमेकांच्या कुटुंबाच्या सहमतीने त्यानी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. नेहा आणि आदर्शच्या या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी हजर होती. या दोघांना एक मुलगीदेखील आहे.

अंतरा शिंदे असे तिचे नाव आहे. त्यांच्या लग्नाचे कधीही समोर न आलेले आणि फारसे कुणीही न पाहिलेले फोटो समोर आलेत. या फोटोंमध्ये आदर्श आणि नेहा मेड फॉर इच अदर कपल असल्याचे पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मीचे सोबती बनण्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

नेहाही दिसायला खूप सुंदर आहे. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. नेहमीच आपल्या स्टाइल आणि फॅशनमुळे ती नेटीझन्सचे लक्ष वेधून घेते. शेअर केलेल्या फोटोंमध्ये नेहाचा गॉर्जियस लूक पाहायला मिळतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close