एक्टिंग मध्ये झिरो असून देखील हिरो बनलेत बॉलिवूडचे हे स्टार, पहा नंबर 4 ला कोणीच करत नाही पसंत..

एक्टिंग मध्ये झिरो असून देखील हिरो बनलेत बॉलिवूडचे हे स्टार,  पहा नंबर 4 ला कोणीच करत नाही पसंत..

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे २० वर्षांपूर्वीही तितकेच प्रसिद्ध होते आणि ते आजही प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्याखेरीज असेही काही स्टार्स आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले पण काही विशेष काहीच करू शकले नाहीत.

बॉलिवूडमधील काही या कलाकारांना चित्रपट मात्र सहज मिळाले पण त्यांच्या अभिनयाने त्यांना आधार दिला नाही.आज आम्ही तुम्हाला अशा पाच बॉलीवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

ज्यांना अजिबात एक्टिंग कशी करतात हे माहित नाही, किंवा आपण असे म्हणू की लोकांना त्यांचा अभिनय कधी आवडला नाही. चला तर मग एक एक करून जाणून घेवू बॉलीवूड मधील या फ्लॉप अभिनेत्यांबद्ल.

१. सोहेल खान:- सलमानचा भाऊ सोहेल खानचे नाव या लिस्ट मध्ये प्रथम येते. सोहेल खानने काही चित्रपट केले आहेत. ते चित्रपट सुद्धा त्याला सलमानमुळे मिळाले आहेत.

पण त्याचा अभिनय आणि शैली चाहत्यांना फारशी आवडली नाही, दोन-चार चित्रपट केल्या नंतर सोहेल खानचं नाव बॉलिवूडमधून गायब झाले होते.

चित्रपटांमध्ये एक ट्रेंड असा आहे की जर कलाकाराला जर अभिनयात यश मिळू शकत नसेल तर चित्रपटाच्या दुसऱ्या क्षेत्रात त्याने आपला हात आजमावा.

सोहेल खानने बॉलिवूडमध्ये एक चांगला निर्माता-दिग्दर्शक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेता म्हणून सोहेल इतका यशस्वी होऊ शकला नाही पण निर्माता-दिग्दर्शक म्हणून तो हि-ट असल्याचे सिद्ध होत आहे.

२. उदय चोप्रा:- मोहब्बतें या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा उदय चोप्रा जास्त चालू शकला नाही, त्यानंतर तो फक्त एक-दोन चित्रपटांत दिसला.

पण बॉलिवूडमध्ये तो अभिनेता म्हणून त्याचे नाव कमवू शकला नाही, त्याचे वडील यश चोपडा एक मोठे निर्माता होते, तरीही उदय चोप्राला चित्रपटाच्या या करीयर मध्ये हवे तसे स्थान मिळवता आले नाही.

३. तुषार कपूर:- जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूरने सुरुवातीला बरेच चित्रपट केले पण तो यशस्वी होऊ शकला नाही, त्यानंतर त्याने रोहित शेट्टीच्या गोलमाल या चित्रपटात काम केले.

गोलमाल चित्रपटाबद्दल तुम्ही म्हणू शकता की हेच त्याचे मोठे यश आणि शेवटचा चित्रपट होता, त्यानंतर तुषार कपूरने जास्त चित्रपटात किंवा इतरत्र काम केले नाही. किंवा आपण असे देखील म्हणू शकतो त्याला इतर चित्रपट मिळाले नाहीत.

४. आर्य बब्बर:- आर्य बब्बरने अब के बरस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटातील त्याच्या सोबत अमृता राव होती पण हा चित्रपट फारसा चांगला व्यवसाय करू शकला नाही.

यामुळे आर्या बब्बरचे करिअर कुठेतरी थांबले. आता तो एक साइड भूमिका साकारून आपले करिअर सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

५. जॅकी भगनानी:- बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माता वासू भगनानी हे जॅकी भगनानीचे वडील आहेत. तो दिसायला अत्यंत देखणा असूनही त्याला बॉलिवूडमध्ये हवे असलेले स्थान मिळवता आले नाही. त्याचा प्रत्येक चित्रपट फ्लॉप झाला आहे. त्याचा अभिनय देखील लोकांना फारच कमी आवडला.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *