हे आहेत सर्वाधिक मानधन घेणारे मराठी अभिनेते, यातील नंबर 3 तर मराठीमधला अक्षय कुमार आहे…

हे आहेत सर्वाधिक मानधन घेणारे मराठी अभिनेते, यातील नंबर 3 तर मराठीमधला अक्षय कुमार आहे…

सेलिब्रेटीजचे आयुष्य आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता  असते. ज्यामुळे कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांचे चाहते फॉलो करत असतात. कलाकारांचे कपडे, फॅशन, त्यांचे अफेअर्स, ब्रेकअप, लग्नाच्या बातम्या, गुडन्यूज अशा सर्वच गोष्टी चाहत्यांसाठी महत्त्वाच्या असतात.

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांचा फार मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराला फॉलो करत असतात.  हे आवडते कलाकार सिनेमात काम करण्यासाठी नेमके  किती मानधन घेतात हे देखील चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचे असते.

कारण त्यावरून त्या कलाकाराच्य टेलेंटची किंमत ठरत असते.  बऱ्याचदा बॉलीवूड कलाकारांच्या मानधनाविषयी आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या बातम्या चर्चेत असतात. मात्र आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतदेखील असे अनेक कलाकार आहेत जे सर्वाधिक मानधन घेण्यामुळे प्रसिद्ध आहेत.

यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या काही आवडत्या मराठी कलाकारांच्या मानधनाबद्दल सांगणार आहोत. असे  काही मराठी कलाकार जे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कलाकार जितका प्रसिद्ध होत जातो तितके त्याचे मानधन वाढत जाते. यासाठी जाणून घेऊया अशा मराठी कलाकारांविषयी ज्यांचे एका चित्रपटाचे मानधन अंदाजे 30 लाखाच्या घरात आहे.

सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते:- मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटांना एका विशिष्ठ उंचीवर नेले आहे. मराठीतील टॉपचे कलाकार असल्याने त्यांचे मानधन जवळजवळ दहा ते पन्नास लाखांच्या घरात आहे.

१. सिद्धार्थ चांदेकर:- मराठी चित्रपटामधील चॉकलेट हिरो म्हणून सध्या सिद्धार्थ चांदेकरची ओळख निर्माण होत आहे. वयाच्या विसाव्या वर्षी अवधुत गुप्तेच्या झेंडा या चित्रपटातून सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. गुलाबजाम, क्लासमेट, ऑनलाईन बिनलाईन, वजनदार अशा अनेक चित्रपटातून त्याने काम केले आहे.

सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरिजमधील सिद्धार्थची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना अधिक आवडली. त्यासोबत जिवलगा या मराठी मालिकेतील त्याची हटके भूमिका सध्या टेलीव्हिजनवर गाजत आहे. त्यामुळे असे म्हणले जाते की सिद्धार्थ चांदेकरदेखील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये आहे.

२. सुबोध भावे:- सुबोध भावे हे नाव सध्या मराठीत सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपट असो की मालिका अथवा नाटक तिन्ही माध्यमांमध्ये सुबोध भावे खूप चांगला कलाकार म्हणून समोर आला आहे. लोकमान्य, बालगंधर्व, आणि काशीनाथ घाणेकर अशा विविध बायोपिकमध्ये काम करून सुबोधने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

मराठी इंडस्ट्रीमध्ये सुबोध सर्वात जास्त मानधन घेतो अशी चर्चा आहे. सुबोध एका चित्रपटासाठी जवळजवळ पन्नास लाखाचे मानधन घेतो असे म्हटले जाते. याशिवाय विविध नाटक आणि मालिकांमधून मिळणारे सुबोधचे उत्पन्न पकडल्यास सुबोध सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

३. स्वप्नील जोशी:- स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहि-ट चित्रपटांमधून स्वप्नीलने आपल्या अभिनयाचे गुण दाखवले आहे. दुनियादारी, तू ही रे, मुंबई-पुणे-मुंबईचे तिन्ही भाग, मितवा अशा अनेक लोकप्रिय चित्रपटातून त्याने काम केले आहे.

या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टी उच्च शिखरावर पोहचल्यामुळे स्वप्नील सध्या प्रत्येक चित्रपटासाठी कमीत कमी चाळीस ते पन्नास लाख मानधन घेतो अशी चर्चा आहे. वयाच्या नवव्या वर्षी स्वप्नील जोशी याने रामानंद सागर यांच्या उत्तर रामायण या टीव्हीवरील कार्यक्रमात छोट्या रामपुत्र कुशची भूमिका साकारली होती.

४. अंकुश चौधरी:- मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार म्हणून अंकुशने आपली ओळख निर्माण केली आहे. अगदी ऑल दी बेस्ट नाटकापासून ते दुनियादारी चित्रपटापर्यंत त्याचा अभिनय प्रवास खूप यशस्वी आहे. अकुंशदेखील त्याच्या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतो अशी चर्चा आहे.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *