‘हा’ आहे जगातील सर्वात महाग चहा, घरदार विकुनही घेता येणार नाही एक किलो चहा, किंमत बघून तोंडात बोट घालाल..

‘हा’ आहे जगातील सर्वात महाग चहा, घरदार विकुनही घेता येणार नाही एक किलो चहा, किंमत बघून तोंडात बोट घालाल..

भारतामध्ये किंबहुना जगातील अनेक देशांमध्ये बहुतांश लोकांची सकाळ ही चहाने होत असते. चहा घेतल्याशिवाय कोणाचीही सुरुवात होत नाही. चहा घेतल्यावर माणसाला एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह येतो, तरतरी येते. त्यामुळे चहा आता सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

ज्या वेळेस मूड गेला असेल किंवा झोप येत असेल त्यावेळेस चहा हा आवर्जून घेतला जातो. चहा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे गुणधर्म असतात. ते आपल्याला जाग ठेवण्यास प्रवृत्त करत असतात. भारतामध्ये चहाची सुरुवात कशी झाली, याचा इतिहास इंग्रजांशी निगडित आहे. इंग्रज भारतामध्ये येण्याच्या पूर्वी आपल्याकडचे लोक हे घरी पाहुणे आल्यानंतर पाणी आणि गूळ द्यायचे.

गुळाचा खडा खाल्ल्यानंतर पाणी पिण्यात येत होते. मात्र, ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी देशावर राज्य करण्यास सुरुवात केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला लोकांना मोफत चहा वाटला. त्यानंतर लोकांना याची सवय लागली आणि त्यानंतर हा चहा मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागला.

अशाप्रकारे भारतामध्ये चहाचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर इंग्रजांनी देशावर राज्य केले. इंग्रज देशांमध्ये निघून गेले. मात्र, इंग्रजांनी आणलेला चहा देशांमध्ये अजूनही जसाच्या तसाच आहे. किंबहुना तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत देखील आहे. भारतामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये भेटत असतात. त्याची चव देखील खूप वेगवेगळी असते.

आज आम्ही आपल्याला एका अशा चहा बद्दल माहिती सांगणार आहोत. या चहाची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटत असेल. मात्र, हे खरे आहे. हा चहा कुठे भेटतो याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणारच आहोत हा चहा चीन मध्ये भेटतो. चीनचे लोक खूप मोठ्या प्रमाणात चहा आणि कॉफी घेत असल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे त्या भागांमध्ये चहाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात येते. या चहा चे नाव डा हाँग पावो असे आहे. या चहाचे उत्पादन चीनच्या फिजियन शहरातल्या वुई सन भागामध्ये होते. या चहाला एक खूप मोठा रंजक असा इतिहास आहे. खूप वर्षांपूर्वी चीनमध्ये मिंग शासन होते. या शासनाचा राजा लंबे चौग होता.

एके दिवशी या राजाची राणी ही खूप आ’जारी पडली. तिच्यावर खूप उपचार करण्यात आले. मात्र, तिच्या प्रकृती काही सुधारणा नव्हती. त्यानंतर तिला हा चहा पाजण्यात आला. त्यानंतर कमालच झाली हा चहा पिल्यानंतर ही महाराणी ताबडतोब उठून चालू लागली. त्यानंतर राजाने या चहाची शेती करण्याचे आदेश दिले.


या चहाची शेती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. मात्र, कालांतराने याचे उत्पादन खूप कमी होऊ लागले. त्यामुळे याची किंमत आता खूप मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेली आहे. हा चहा अतिशय गुणकारी असून अनेक आ’जारांवर तो प्रभावशाली असल्याचे सांगण्यात येते. आ’जार जर आपल्याला असतील तर ते त्या माध्यमातून कमी होतात.


या चहासाठी एका किलोला तब्बल नऊ कोटी रुपये मोजावे लागतात. या चहा मुळे आपल्याला अंगात ताकद देखील येत असल्याचे सांगण्यात येते. दहा ते पंधरा ग्राम चहा घेण्यासाठी लोकांना लाखो रुपये मोजावे लागतात. मात्र, एवढा महाग चहा असून देखील याला लोक लाखो रुपये मोजत असल्याचे सांगण्यात येते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *