सांगलीकरांवर नवं संकट; पुराचे पाणी ओसरत असताना थेट घराच्या छतावर दिसल्या मगरी, पहा VIDEO..

सांगलीकरांवर नवं संकट; पुराचे पाणी ओसरत असताना थेट घराच्या छतावर दिसल्या मगरी, पहा VIDEO..

मागील काही दिवसांपासून सततच्या होणाऱ्या पावसाच्या संतत धारेमुळे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र होरपडून निघाला आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला तो कोकण, सांगली आणि चिपळूणला. २०१९ मध्ये देखील सांगलीमध्ये असाच महाभयानक पुर आला होता. आणि यावर्षी देखील २०१९ पेक्षाही मोठा महापूर असल्याचे बोलले जात आहे.

कृष्णा नदीला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान आता सांगलीकरांची चिंता नव्या संकटाने वाढवली आहे आणि ते संकट म्हणजे मगरींचे. होय, कारण गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील विविध भागांत मगर रस्त्यांवर, घरांच्या छतावर फिरताना दिसत आहेत.

कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. या महापुराने मगरी बाहेर पडल्या आहेत. अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत. जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. एका मगरी ने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव केले आहे. या मगरीचे व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहेत.

दोन-तीन दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकार मानवी वस्तीत मगर आढळून आली होती. सांगलीतील रस्त्यांवर मगर मुक्तपणे संचार करताना दिसून आली होती. याचा व्हिडीओ सुद्धा स्थानिकांनी आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता आणि तो व्हायरल सुद्धा झाला होता. अशा प्रकारे मगर परिसरात फिरत असल्याने सांगलीकरांची चिंता वाढली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबांमधील सुमारे 1 लाख 97 हजार लोक विस्थापित झाले आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे.

त्याचप्रमाणे या अतिवृष्टी व महापूराच्या नुकसानीच्या वेळीही भरपाई देताना राज्य सरकार सकारात्मक निर्णय गेईल. आपली जबाबदारी पार पाडण्यात राज्य शासन कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *