Home » सलमान सोबत काम करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे ही अभिनेत्री, म्हणाली….
बॉलीवूड

सलमान सोबत काम करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे ही अभिनेत्री, म्हणाली….

तुम्हाला माहीतच असेल की बिग बॉस सिझन १४ हा शो ३ ऑक्टोबर २०२० पासून चालू झालेला असून त्याचे खूप मोठे प्रीमियर सलमान खानने केले आहे आणि तोच हाही पूर्ण शो तोच होस्टिंग करत आहे. शो जसा सुरू झाला तसंच त्यातील वादविवादसुद्धा सुरू झाले. बिग बॉसच्या घरात रंगत असलेल्या टास्कदरम्यान एकमेकांवर कुरघोडी करणं, एकमेकांना कमी लेखणं इथपासून ते आता एकमेकांना शारीरिक दुखापत करण्यापर्यंतही मजल गेली आहे.

बिग बॉस १४ च्या घरातून गायिका सारा गुरपाल नुकतीच बाहेर पडली आहे. मात्र सोशल मीडियावर तिची अजूनही चर्चा आहे. साराला शोमधून काढणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी मांडले आहे. त्यातच तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान साराला निक्की तांबोळीकडून दुखापत झाली. इम्युनिटी टास्कदरम्यान सारा जेव्हा बुलडोझरवर बसली तेव्हा तिला तिथून उठवण्याचा जोरदार प्रयत्न निक्कीकडून केला जात होता. त्याच प्रयत्नात निक्कीचा हात साराच्या तोंडाजवळ गेला आणि तिची नखं साराच्या डोळ्याला लागली. दुखापत होताना आणि झाल्यानंतरचा काही भाग बिग बॉसच्या एपिसोडमधून एडिट करण्यात आला होता.

कालच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये सारा गुरपाल म्हणाली की ती शोच्या होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टारची खूप मोठी फॅन आहे. इतकेच नाही तर तिने सलमानबरोबर काम करण्याची इच्छा आहे असे देखील ती म्हणाली आहे. सारा म्हणाली, जर मला सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.

मला फक्त सलमान बरोबर काम करायला मिळूदे बाकी कसलीही मला हरकत नाही असे तिने यावेळी सांगितले होते. पंजाबी सिंगर असलेल्या साराला तिच्या राज्यात केलेल्या कामाचा तिला अत्यंत अभिमान आहे. ती म्हणते की बिग बॉस सारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर जागा मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पंजाबी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला ती या कामाचे संपूर्ण श्रेय देते.

ती म्हणते, “आज मी जे काही आहे ते सर्व माझ्या पंजाबमुळे आहे, म्हणूनच पंजाब माझ्यासाठी नेहमीच प्रथम स्थानावर राहील. लोक मला ओळखतात कारण मी पंजाबमध्ये काम केले आहे.  बिग बॉस देखील मला माझ्याकामामुळे एकेदिवशी ओळखेल.  असे तिने म्हणले आहे.

साराच्या डोळ्यावर सध्या उपचार सुरू असून त्यानंतर ती तिच्या गावी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे साराने तिच्या लग्नाची गोष्ट लपवल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून काढलं जात असल्याची चर्चा आहे. पंजाबी गायक तुषार कुमारने सारासोबत लग्न केल्याचा खुलासा केला आहे.

बिग बॉसच्या बेघर करण्याच्या निर्णयावर सारा गुरपाल यांनी कुणाचेही नाव न घेता म्हटले की, माझ्यावर अन्याय झाला आहे. जर प्रेक्षकांनी मला या कार्यक्रमातून वगळले असेल तर मला वाटलं असेल की त्यांना माझे व्यक्तिमत्त्व आवडत नाही आणि मला बदलण्याची गरज आहे, परंतु जनतेला माझे व्यक्तिमत्त्व आवडत होते परंतु हे सर्व एका माणसामुळे झाले जे पूर्णपणे अयोग्य होते.

 

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment