श्री राम यांच्या अयोध्याचे एकमेव वंशज; ज्यांनी महाभारताच्या यु’द्धात घेतला होता भाग, कौरवांच्या बाजूने लढले होते युद्ध….

श्री राम यांच्या अयोध्याचे एकमेव वंशज; ज्यांनी महाभारताच्या यु’द्धात घेतला होता भाग, कौरवांच्या बाजूने लढले होते युद्ध….

ऐतिहासिक

आजवर महाभारताचे युद्ध एवढे भी’षण यु’द्ध इतर कोणतेच नव्हते, असे समजले जाते. हिंदू धर्मामध्ये महाभारताच्या युद्धाला वेगळेच महत्त्व आहे. वि’ध्वंस होऊन देखील नवीन युगाची सुरुवात म्हणून या युद्धाकडे बघितले जाते. संपूर्ण वि’नाश झाल्यानंतरच, नवीन युगाची सुरुवात होऊ शकते हे या यु’द्धातून सांगितले आहे.

या यु’द्धामध्ये कित्येक देवतांनी वेगवेगळ्या रुपात सहभाग नोंदवला होता. देवता आणि त्यांच्या मुलांनी आणि सर्वात विशेष म्हणजे खुद्द विष्णूने देखील या युद्धात सहभाग नोंदवला होता. मात्र भगवान विष्णूने या युद्धामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र उचलले नव्हते. त्यामुळेच येणारा कल्की अवतार सर्वात वि’ध्वंसक ठरणार असे सांगितले जाते.

कारण कल्की अवतारामध्ये स्वतः विष्णू शस्त्र उचलून युद्ध करणार आहेत. महाभारताच्या युद्धात कोणी कोणी सहभाग नोंदवला होता, कोणकोणत्या मोठाल्या राज्यांची वंशज होते हे सर्व जाणून घेण्याची कायमच सगळीकडे उत्सुकता असते. भगवान श्रीराम म्हणजेच रघुवंशी कोणता राजा या युद्धामध्ये सहभागी होता, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भगवान श्रीराम च्या 32व्या पिढीचे वंशज बृहदबल यांनी कौरव-पांडवांच्या युद्धात आपला सहभाग नोंदवला होता. कायमच कौशलचे साम्राज्य सर्वात प्रतापी साम्राज्य पैकी एक समजले जाते, त्यांच्या वडिलांचे नाव विश्रुतवांत असे होते. इंद्रप्रस्थ वर राज्याभिषेक झाल्यावर युधिष्ठिरने राजसूय यज्ञ केला होता, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.

त्यावेळी भीमने बृहदबालला पराभूत केले होते. त्यानंतर दुर्योधनाच्या वैष्णवी यज्ञाच्या वेळी, कर्णने आपला दिग्विजय कायम ठेवत पुन्हा एकदा त्यांना पहा परास्त केले. त्यामुळे इच्छा नसून देखील श्रीराम ची 32 वे वंशज बृहदबाल, पांडवांकडून नाहीतर कौरवांकडे युद्धामध्ये लढत होत. युद्धाच्या तेराव्या दिवशी अभिमन्यूने त्यांचा वध केला.

चक्रव्यूह मध्ये जेव्हा अभिमन्यूने प्रवेश केला तेव्हा, सात महारथिंसोबत त्याचे युद्ध सुरू झाले; तत्पूर्वी बृहदबाल सोबत शूर अभिमन्यूने युद्ध केले आणि त्यांचा वध केला. महाभारताच्या पुराणांमध्ये असे वर्णन आहे की, कौशल प्रदेश त्यानंतर जास्त शक्तिशाली राहिला नाही आणि पाच भागांमध्ये वाटला गेला. दक्षिण कोशल चे राजा बृहदबाल होते आणि त्यानंतर त्यांचा मुलगा बृहत्क्षण याने त्यांचे राज्य सांभाळले.

अशी होती श्रीरामाची वंशावळ
1. श्रीराम यांचे दोन मुले लव आणि कुश.
2. कुश यांना अतिथी नावाचा मुलगा झाला.
3. अतिथी यांच्या मुलाचे नाव निषध होते.
4. निषाध यांना नल नावाचा पुत्र झाला.
5. नबस असे नल यांच्या मुलाचे नाव होते.
6. नबस च्या मुलाचे नाव पुंडलिक होते.

7. क्षेमधनवा असे पुंडलिक यांच्या मुलाचे नाव होते.
8. देवणीक हे क्षेमधनवा च्या मुलाचे नाव होते.
9. अहीनगर असे देवनिक यांच्या मुलाचे नाव होते.
10. अहीनगर च्या मुलाचे नाव रूप होते.
11. रूप च्या मुलाचे नाव रुर होते.
12.रुर च्या मुलाचे नाव परीयात्र होते.
13.परीयात्र च्या मुलाचे नाव दल होते.
14.शल असे दल च्या मुलाचे नाव होते.
15. उक्त शलच्या मुलाचे नाव होते.

16.वज्रनाभ हे उक्त च्या मुलाचे नाव होते.
17. शंखनाभ असे वज्रनाभ च्या मुलाचे नाव होते.
18. व्यथिताश्व हे शंखनाभच्या मुलाचे नाव होते.
19.विश्वसह असे व्यथिताश्वच्या मुलाचे नाव होते.
20.हिरण्यनाभ हे विश्वसहच्या मुलाचे नाव होते.
21. हिरण्यनाभच्या मुलाचे नाव पुष्य होते.
22. पुष्य च्या मुलाचे नाव ध्रुवसंधि होते.
23. ध्रुवसंधिच्या मुलाचे नाव सुदर्शन होते.

24. अग्निवर्णा असे सुदर्शनच्या मुलाचे नाव होते.
25. शीघ्र असे अग्निवर्ण च्या मुलाचे नाव होते.
26. शीघ्रच्या मुलाचे नाव मरू होते.
27. मरूच्या मुलाचे नाव प्रसुश्रुत होते.
28. सुगंधी हे प्रसुश्रुत च्या मुलाचे नाव होते.

29. सुगंधीच्या मुलाचे नाव अमर्ष होते.
30. अमर्षच्या मुलाचे नाव महास्वन होते.
31. महास्वन याना विश्रुतवांत नावाचा पुत्र झाला.
32. विश्रुतवांत यांच्या मुलाचे नाव बृहदबाल होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *