शिल्पा शिंदेला एका एपिसोड साठी मिळतात इतके पैसे, पण करावे लागते असे वाढीव काम, या कामामुळे चालते “भाभी जी घर पर हे” मालिका..

शिल्पा शिंदेला एका एपिसोड साठी मिळतात इतके पैसे, पण करावे लागते असे वाढीव काम, या कामामुळे चालते “भाभी जी घर पर हे” मालिका..

तारक मेहता का उलटा चश्मा प्रमाणे भाभीजी घर पर है ही मालिका देखील प्रेक्षकांसाठी मोठी पसंती ठरली आहे. भाभीजी घर पर है मालिका 2015 मध्ये सुरु झाली होती आणि काही भागानंतरच हा शो सुपरहि*ट ठरला. भाभीजी घर पर हैं मालिकेतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंगुरी भाभी जी भूमिका शिल्पा शिंदेने साकारलेली आहे. शिल्पा शिंदेच्या प्रत्येक शैलीने प्रेक्षकांना, विशेषत: तिच्या सही पकडे है या संवादाने लोकांना आकर्षित केले. नंतर शिल्पा शिंदेने शो सोडला आणि तिची जागा शुभांगी अत्रेने घेतली पण शिल्पा शिंदे अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

शिल्पा शिंदे सध्या काय करत आहे:- अलीकडेच वादामुळे शिल्पा शिंदेचे नाव चर्चेत आले. वास्तविक ती गँग्स ऑफ फिल्मस्तान या कॉमेडी शोमध्ये सहभागी होणार होती. सुनील ग्रोव्हर सोबत तिला पाहून चाहते खूप उत्साही झाले होते. पण गोष्टी उलट्या झाल्या. शिल्पाने भाभी जी घर पर है वर अनेक आ*रोप केले आणि हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.

भाबीजी घर पर हैं क मध्ये आपली फसवणूक झाल्याचा दावा तिने केला तेव्हा पासून हा वाद सुरू झाला. त्यामुळे पुढे शिल्पा शिंदे सुनीलच्या नव्या शो चा भाग होणार नसल्याचे सांगण्यात आले. बिग बॉसच्या या माजी स्पर्धकाचा असा दावा आहे की सुनील ग्रोव्हरने सर्व लाइमलाइट चोरली आहे, त्यामुळे ती त्याच्याबरोबर काम करण्यास उत्सुक नव्हती. अखेरीस तिला बाहेरून कळले की सुनील ग्रोव्हर खरोखरच या कार्यक्रमाचा एक भाग आहे. शिल्पा शिंदेला वाटते की सुनील ग्रोव्हरला आपल्यासोबत काय घडले याची जाणीव होती.

भाभीजी घर पर हैं मध्ये शिल्पा शिंदे किती पैसे मिळायचे हा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे. हे उत्तर स्वतः शिल्पाने एका मुलाखती दरम्यान दिले होते. तिने सांगितले आहे की अंगुरी भाभीच्या भूमिकेसाठी प्रति भागाला तिला 35,000 रक्कम देण्यात येत होती.

छोट्या पडद्यावरील भाभी जी घर पे है या लोकप्रिय मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे आज प्रत्येक चाहत्याच्या मनावर राज्य गाजवत आहे. त्यातच शिल्पा बिग बॉस ११ च्या विजेती ठरल्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये शिल्पा आणि हिना खान यांच्याकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात होतं. त्यामुळे अजुनही त्यांच्यात वाद होताना दिसतात. विशेष म्हणजे हा शो संपल्यानंतरही यांच्यातील भांडण सुरु असून हे वाद केवळ त्यांच्यातच नाही तर त्यांच्या चाहत्यांमध्येही पाहायला मिळतात.

हिना आणि शिल्पा या दोन्ही अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक्टीव्ह आहे. विशेष म्हणजे या दोघींच्याही फॅनफॉलोअर्स संख्या कमालीची आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा हिनाचे चाहतेही शिल्पावर टीका करत असतात.याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून हिनाच्या चाहत्यांनी शिल्पाच्या एका फोटोवर बरीच टीका केली आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *