व्हाट्सअप वर सेंड केलेल्या फोटोचा ‘हा’ दिसणारा फाईल नंबर मध्ये दडलेली असते ‘ही’ गुपीत माहिती, असा होऊ शकतो गैरवापर..

व्हाट्सअप वर सेंड केलेल्या फोटोचा ‘हा’ दिसणारा फाईल नंबर मध्ये दडलेली असते ‘ही’ गुपीत माहिती, असा होऊ शकतो गैरवापर..

आज कोणाच्याही फोनमध्ये व्हॅट्सऍप हे सगळ्यात कॉमन ऍप आहे. जोपर्यंत या व्हॅट्सऍप वर आपल्याला गुड मॉर्निंग चा मॅसेज येत नाही, बऱ्याच वेळा दिवस सुरूच झाला नाही असं वाटत. सकाळी उठलं कि फोन मध्ये, कोणाचे मेसेज आले आहेत? कोणती बातमी आली आहे ? काय नवीन? असं सगळंच आपल्याला व्हॅट्सऍप वर मिळते म्हणून आपल्यापैकी कित्येक लोकं या व्हॅट्सऍप च्या पूर्णपणे आ’हारी गेले आहेत.

आपल्या जवळच्या लोकांना आपली खुशाली समजवायची असेल किंवा त्याची खुशाली जाणून घ्यायची असेल तर केवळ एका व्हॅट्सऍप च्या मेसेज चे अंतर आहे. फॅमिली गग्रुप मध्ये आपल्या लक्षात नसलेल्या, सगळ्याच दूरच्या जवळच्या नातेवाईंकांसोबत आपण सहजपणे संपर्कात राहू शकतो. काही दिवसांपूर्वी हेच व्हॅट्सऍप आता बंद होणार कि काय अशी शक्यता वर्तवली जात होती.

या ऍपच्या मालकांनी प्रायव्हसी सेटिंग्स बदलल्या असल्यामुळे, या ऍप बद्दल शंका व्यक्त केली जात होती. मग या ऍप च्या जागी अनेक ऍप आपल्याकडे उपलब्ध असल्याचे समोर आले. टेलेग्राम, सिग्नल असे काही ऍप ज्यामध्ये आपली प्रायव्हसी सुरक्षित असण्याचा दावा केला गेला होता. त्यामुळे अनेकांनी हे ऍप्स आपल्या फोनमध्ये डाउनलोड तर केले मात्र व्हॅट्सऍप वापरण्याचे बंद नाही करू शकले.

या ऍप मध्ये अश्या अनेक बाबी आहेत ज्याकडे आपण थोडे लक्ष दिले तर आपली प्रायव्हसी अबाधित राहू शकते. अश्या अनेक बाबी आहेत ज्या या ऍप मध्ये थोड्या जास्त काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजे. जसं की कोणत्याही ओपन वायफाय नेटवर्क ला आपला फोन कनेक्ट नाही केला गेला पाहिजे.

आणि झालाच तर त्या नेटवर्क चा वापर करून आपले सोशल मीडिया ओपन नाही केले पाहिजे. त्यामुळे त्यांना आपला फोन आणि त्यामधील माहिती सहजपणे मिळू शकते. त्याचबरोबर, ओपन वायफाय नेटवर्क मध्ये जर आपण आपले व्हॅट्सऍप वापरले तर, त्यामधील सर्व डेटा चोरी होऊ शकतो. अश्या काही बाबतीत आपण खबरदारी बाळगणे सगळ्यात चांगले आहे.

आपण जेव्हा व्हॅट्सऍप वर एखादा फोटो किंवा, डॉक्युमेंट किंवा फाईल शेअर करतो तेव्हा आपण बघतो कि तिथे एक नंबर येतो. हा नंबर नक्की काय असतो याबद्दल आपण विचार केला आहे का?

हा नंबर आपल्यासाठी जितका साधा वाटतो तेवढाच तो महत्वाचा देखील आहे. हा नंबर, त्या डॉक्युमेंट किंवा फोटोची तारीख त्यामध्ये लपवून असतो. त्या नंबर मधून ते डॉक्युमेंट किती तारखेला शेअर केले याबद्दलची महत्वपूर्ण माहिती मिळते. इतकेच काय तर, कोणत्या दिवशी किती वाजून किती मिनिटाला हे डॉक्युमेंट शेअर झाले आहे अशी सगळी माहिती यामधून मिळते.

त्यामुळे अनेक वेळा, कोणतेही डॉक्युमेंट शेअर करताना ते रिनेम म्हणजेच त्याचे नाव बदलायचे का असे विचारण्यात येते. आणि अनेक वेळा जाणकार शेअर करताना नाव बदलूनच शेअर करतात. YYYY/MM/DD_HR:MIN:SEC अश्या पद्धतीने त्या नंबरची रचना असते. सगळ्यात पहिले साल म्हणजे २०१९ किंवा २०२० असे त्यानंतर महिना जसे कि, ०१ किंवा ११ आणि नंतर तारीख म्हणजे ०७ किंवा २०, ३१ असे सुरुवातीच्या चार क्रमांकाची माहिती असते.

त्यानंतर त्या दिवशीची वेळ, म्हणजेच सर्वप्रथम तास,मग मिनिटे आणि सर्वात शेवटी सेकंड अशी रचना बाकीच्या ६ क्रमांकाची असते. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, यामाहितीद्वारे हॅकर्स तुमचा फोन किंवा माहिती हॅक करू शकता. मात्र याची पूर्ण खात्री कोणीही देत नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *