वडील शाळेबाहेर विकायचे कचोरी समोसे पण आज मुलगी आहे बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध सिंगर…पहा फोटो..

चित्रपटसृष्टीत काम करणारे स्टार्स आहोरात्र परिश्रम घेऊन यश मिळवत असतात. फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या बहुतांश स्टार्सना त्यांच्या बालपणात गरीबीचा सामना करावा लागला आहे.
आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच एका टॉप सिंगर बद्दल सांगणार आहोत जिचे वडील शाळेबाहेर समोसे विकत असत. पण आज तिची गणना बॉलिवूडच्या टॉप सिंगर मध्ये केली जाते.
आम्ही बोलत आहोत उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये जन्मलेल्या नेहा कक्कड़ हीच्याबद्दल. आज नेहा कक्कड़ला कुठल्याही ओळखीची गरज नाही.
नेहा कक्कड़ बॉलिवूडमधील आता एक सुप्रसिद्ध सिंगर आहे. तिने एकापेक्षा एक सुपरहि-ट गाणे दिले आहेत. इतकेच नाही तर नेहा कक्कर टीव्हीवरील अनेक रियालिटी सिंगिंग शोची जज देखील राहिली आहे.
नेहा कक्कड़ने वयाच्या केवळ वयाच्या 4 व्या वर्षी गायन करणे सुरू केले. नेहा कक्कडची बहीण सोनू कक्कड़ जागरण आणि भजने गात असत. नंतर नेहाचे कुटुंब दिल्ली येथे राहण्यास आले. नेहा कक्कर आणि तिच्या बहिणीचे हे प्राथमिक शिक्षणाचे वय होते.
११वीत शिकत असताना नेहाला इंडियन आयडॉलमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. जेव्हा नेहा कक्करने इंडियन आयडॉलमध्ये भाग घेतला तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती.
जरी नेहा कक्कड़ला त्यावेळी इंडियन आयडल ही पदवी जिंकता आली नाही परंतु ती आता इंडियन आयडॉलमध्ये जज म्हणून काम करत आहे. एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वतः तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही सांगितले.
तिचे सुरुवातीचे आयुष्य खूप वाईट असल्याचे नेहाने सांगितले. तिच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. यावेळी ती पैसे मिळवण्यासाठी भजनात आणि जागरणात गात असत.
तिचे वडील तिच्याच शाळेबाहेर समोसे विकत असत. ज्यामुळे नेहाबरोबर शिकणारी मुले तिला खूप लहान व गरीब मानत आणि तिला त्रास देत असत. पण आज नेहा एक सुप्रसिद्ध गायिका बनली आहे. अलीकडेच नेहा कक्करने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगशी लग्न केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा कक्कर लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. नेहाने २४ ऑक्टोबर रोजी गायक रोहनप्रीत सिंहशी तिने लग्न केले आहे.
कोण आहे रोहनप्रीत:- रोहनप्रीत एक सिंगर आहे. त्याने रियालिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये त्याने भूमिका केली होती. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.
लग्नास आता १५ दिवस होवून सुद्धा अजुनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नेहाच्या लग्नातील प्रत्येक सोहळा विशेष गाजला आहे.
त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये नेहा-रोहनची चर्चा सुरुच आहे. यामध्येच सगळ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी होती.
या दोघांची प्रेम कहाणी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यामुळेच अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत नेहा- रोहनने त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी शेअर केली आहे.
नेहा सांगते की आमच्या प्रेमाची सुरुवात झाली ती नेहु दा व्याह या गाण्याच्या शूटपासून. सेटवर बऱ्याच वेळा मी त्याचे निरीक्षण केले तो प्रत्येकाशी आदराने आणि नीट वागत-बोलत असे.
त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या सर्व मुलांमध्ये मला तो जास्त चांगला वाटत होता. त्याला पाहिल्यावर मला नेहमी असे वाटायचे की हा फक्त माझा आहे.
नेहाप्रमाणेच रोहनप्रीतनेदेखील त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तो म्हणाला मला ती सगळ्या मुलींच्या तुलनेत वेगळी वाटली. त्यामुळे एक दिवस हिंमत करुन मी तिच्या समोर गेलो आणि तिला प्रपोज केले.
विशेष म्हणजे तिने देखील मला होकार दिला असे रोहनप्रीत म्हणाला आहे. नेहा आणि रोहनप्रीत यांनी २४ ऑक्टोबर रोजी विवाह केला. यंदा २०२० मधील सर्वात गाजलेला विवाहसोहळा म्हणून या दोघांच्या लग्नाकडे पाहिले जात आहे.