रात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..

रात्रीस खेळ चाले २ नंतर झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, तुमची आवडती मालिका संपणार..

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गंबाई सासूबाई आणि माझा होशील ना या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मने जिंकली आहेत. या पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

या मालिकेच्या जागी येत्या २ नोव्हेंबरपासून वाघोबा प्रॉडक्शनची कारभारी लय भारी ही मालिका प्रसारित होणार आहे आहे. या मालिकेत लागिर झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारणारा निखिल चव्हाण मुख्य भूमिका साकारणार आहे. तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे दिसणार आहे.

कारभारी लयभारी मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दाखवण्यात आला होता. कारभारी लयभारी या झी मराठीवरच्या नवीन मालिकेच्या प्रोमो रिलीजनंतर मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकाराची उभे राहण्याची आणि भाषणाची स्टाईल पाहता ही मालिका राजकारणावर भाष्य करणारी आहे असा तर्क लावत अनेकांनी लावला होता.

ही राजकारणाची जोड असणारी एक प्रेमकहाणी आहे हे सुद्धा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. तेव्हा आता प्रेम आणि राजकारणाची सांगड घालणारी ही मालिका येत्या काळात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. रांगडा राणादा आणि आदर्श पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. परंतु ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेवर यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा राणादा आणि आदर्श स्त्री म्हणजे पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. अधिकृतरित्या हे जाहीर करण्यातच आले नसले तरीही तुझ्यात जीव रंगला ही मालिका ज्यावेळी प्रसारित होते त्याचवेळी एक नवी मालिका सुरु होत असल्याच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पाठबळ मिळाले आहे.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदा अक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत होते. त्यामुळे अनेकांचे लाडके असलेले राणादा आणि पाठक बाई आता छोट्या पडद्यावर दिसणार की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *