बीडमध्ये ‘या’ पठ्ठ्याने चक्क न्यायाधीशांना लावला २००₹ दंड; म्हणाला नियम सर्वांना सारखाच…

बीडमध्ये ‘या’ पठ्ठ्याने चक्क न्यायाधीशांना लावला २००₹ दंड; म्हणाला नियम सर्वांना सारखाच…

सध्या को’रोनामुळे देशासह अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे कडक नियम पाळले जात आहेत. मात्र, अनेक जण असे असतात की, नियमाची पायमल्ली करून प्रशासकीय यंत्रणेवर ताण देत असतात. त्यामुळे अशा लोकांना दंड लावून पोलीस प्रशासन व स्थानिक मनपा अधिकारी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना दंड लावत असतात.

मात्र, काही जण असे असतात की वारंवार दंड लाऊन देखील त्यांना समजत नाही. देशभरामध्ये सध्या को’रोनाची दुसरी लाट आलेली आहे. गेल्या महिन्याभरापासून अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन ची परिस्थिती आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने एक तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे काही अंशी व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील 13 जिल्ह्यांना केवळ यातून सूट देण्यात आलेली आहे. मात्र, अजून काही शहरामध्ये को’रोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथे कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत आणि रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना दंड देखील करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे विना मास्क फिरणारे, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणारे अशांना देखील दंड लावण्यात येत आहे.

मात्र, एकदा दंड भरून देखील या लोकांना समजत नसते. त्यामुळे असे लोक हे पो’लिसांशी हुज्जत घालताना आपण अनेकदा पाहिलेच असेल. मात्र, एखाद्या न्यायालयीन प्रक्रियेत असणारे व्यक्तीला दंड भरावा लागला असेल, तर आपल्याला कसे वाटेल. अशी घटना घडलेली आहे. ही घटना बीडमध्ये नुकतीच उघडकीस आलेली आहे.

न्याय प्रक्रियेत म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असलेली व्यक्तीच नियम मोडते, तेव्हा सर्वसामान्यांचे काय, असा देखील लोक प्रश्न विचार त आहे. बीड शहरातील शिवाजी महाराज चौकात मध्ये जालिंदर बनसोडे हे वाहतूक हवलदार ड्युटी करत होते. या वेळी नाकाबंदी करून त्यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनेकांना दंड केला.

या वेळी त्यांच्या समोरून एक कार येत होती. या वेळी त्यांना दिसले की कार चालकाने सीट बेल्ट लावलेला नाही. त्यामुळे बनसोडे यांनी ती कार आडवली. त्यानंतर त्यांना आपण काय करता, असे विचारले. त्यावर कारचालक काहीच बोलला नाही. त्यानंतर कार चालकाकडे बनसोडे यांनी कागदपत्रांची मागणी केली.

त्यानंतर या व्यक्तीने ओळखपत्रे दाखवली त्या ओळखपत्रावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असे लिहिले होते. त्यामुळे बनसोडे हेच थोडे मागे सरकले. मात्र, त्यांनी न्याय दंडाधिकार्‍यांना दोनशे रुपये दंड आकरून नियम दाखवून दिला. त्यानंतर दंडाधिकारी यांनी देखील सीट बेल्ट न लावल्याचा दंड भरला.

त्यानंतर पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्याशी संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तसेच पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना देखील संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयीन व्यक्ती जर नियम मोडत असेल तर इतरांचे काय असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *