या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मॉल मध्ये चक्क गुढघ्यावर बसून केले मित्रास प्रपोज, नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल..

आज आम्ही मराठी सिनेसृष्टीतील एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत जिने नुकतेच आपला लाइफ पार्टनर शोधला आहे. या अभिनेत्रीला आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखता ही तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.
या अभिनेत्रीला आपण मराठी बिग बॉस सीजन २ मध्ये पहिले आहे, तसेच ती सध्या स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते मध्ये दिसत आहे. तिची ही भूमिका सुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
हो तुम्हाला आता समजले असेल आम्ही अभिनेत्री रुपाली भोसले बद्दल बोलत आहोत. रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या प्रसिद्ध मालिकेत देखील ती दिसली होती.
सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. रुपाली भोसले ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक होती.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोद्वारे तिने तिचा खास मित्र अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले आहे.
अशी होती त्यांची पहिली भेट:- रुपाली आणि अंकित काही कामानिमित्त एका कॉफी शॉपमध्ये पहिल्यांदा भेटले होते. पहिल्याच भेटीत अंकितचा साधेपणा, शांत स्वभाव आणि त्याची स्माइल रुपालीला आवडली होती.
तर अंकितलाही पहिल्याच भेटीत रुपाली आवडली होती. अंकितबद्दल रुपाली म्हणाली की अंकितचा स्वभाव फार सकारात्मक आहे.
त्याच्या बीजी कामातून तो माझ्यासाठी नेहमीच वेळ काढत असतो. माझ्या कामाचाही तो फार आदर करतो. या नात्याबद्दल बऱ्याच खास गोष्टी आहेत.
तर या नात्यात माझ्यापेक्षा जास्त प्रेम रुपाली करते असे अंकितने सांगितले आहे. रुपाली ही काळजी घेणारी, साथ देणारी व्यक्ती आहे. तिच्या प्रत्येक कामात ती परफेक्ट आहे. असे त्याने सांगितले.
असे केले प्रपोज:- प्रत्येक नात्यात कोणी कोणाला कसे प्रपोज केले हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. सहसा मुले मुलींना प्रपोज करतात.
पण रुपालीने अंकितला अत्यंत रोमँटिक स्टाइलने प्रपोज केले आहे. याविषयी अंकितने सांगितले की पुण्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये असताना रुपाली अचानक थोड्या वेळासाठी गायब झाली होती.
ती जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा तिच्या हातात गुलाबाचे फूल होते. मॉलमध्ये ती चक्क गुडघ्यावर बसली आणि मला तिने प्रपोज केले. ते खास क्षण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहिले आहेत. रुपालीसारखी मुलगी मला भेटली हे मी माझे भाग्य समजतो.
रूपालीचा लग्नाचा प्लॅन:- सध्या तरी लग्न करण्याचा विचार नसल्याचे रुपाली आणि अंकितने स्पष्ट केले आहे. आम्ही दोघंही सध्या करिअरमध्ये फार बीजी आहोत आणि एकमेकांसोबत आणखी काळ एकत्र घालवण्यावर आमचा भर आहे.
या नात्याला अवघा एक महिना झाल्याने लग्नाची घाई तरी इतक्यात करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रुपालीने अधिकृत काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे तिचे चाहते याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.