या प्रसिद्ध अभेनेत्रीला मिळाली बला*त्का*राची धमकी, साउथ अभिनेता ज्युनिअर एनटीआर चा यात समावेश आहे…

सोशल मीडियावर अनेकदा स्टार्स ट्रोल होत असतात. कधी आणि कोणाला निशाण बनवले जाईल हे कोणालाही माहिती नाही. अलीकडेच लोकांनी प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्राला जोरदर ट्रोल केले गेले आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा सोशल मीडिया वर चांगलीच ट्रोल झाली आहे.
मीरा चोप्रा ही ज्युनियर एनटीआरची फैन नसल्यामुळे तीला हे सर्व झेलावे लागले आहे. ट्विटरवर कट्टर एनटीआरच्या चाहत्यांनी मीरा चोप्राला यामुळे शिवीगाळ केली त्यानंतर ती वैतागली आणि तिने सायबर पोलिसांत याबद्दल तक्रार दिली.
खरे तर मीरा चोप्राने तिच्या चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचे एक सत्र आयोजित केले होते. या दरम्यान चाहत्यांनी तिला ज्युनियर एनटीआर बद्दल प्रश्न विचारला असता ज्याच्या उत्तरात मीरा चोप्रा म्हणाली की ज्युनियर एनटीआर कोण आहे हे मला माहित नाही. मी त्याची फॅन नाही.
मीरा चोप्राच्या या प्रत्युत्तरानंतर काही लोकांनी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले. मीरा चोप्राच्या या उत्तरामुळे ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांना चांगलाच राग आला होता आणि मीरा चोप्रावर त्यांनी सर्व प्रकारच्या घाणेरड्या आणि अ*श्लील कमेंट केल्या. इतकेच नाही तर या वेळी संतप्त चाहत्यांनी मर्यादा ओलांडून मीरा चोप्राला बला*त्का*राची धमकी देण्यास सुरुवात केली.
काही लोकांनी तर तिला पॉर्नस्टार म्हटले तर काहींनी त्याच्या आई-वडिलांबद्दल कोरोना विषाणूमुळे मरण होऊदे असे म्हणले. त्याचवेळी बर्याच युजर्सनी मीरा चोप्राला बला*त्का*राची धमकीही दिली. यानंतर #WeSupportMeeraChopra असा टेग मीरा चोप्राच्या समर्थनार्थ ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरवात झाली. मीराने अशा लोकांबद्दल राष्ट्रीय महिला आयोग आणि सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मीराने ज्युनियर एनटीआरला टॅग करून विचारले की मला माहित नाही की मला वेश्या आणि एक पॉर्न स्टार का म्हणले आहे कारण मला महेश बाबू अधिक जास्त आवडतो म्हणून. आपण अशा चाहत्यांसह यशस्वी आहात काय हे मला सांगा? मला आशा आहे की आपण माझ्या ट्विटकडे दुर्लक्ष करणार नाही. असे तिने या पोस्ट मध्ये लिहले आहे.
मीरा चोप्राने पुढे लिहिले की, एखाद्याचे चाहते असणे हा गु*न्हा आहे हे मला माहित नव्हते. मला मुलींना सांगायचे आहे की आपण ज्युनियर एनटीआरचे चाहते नसल्यास तुमच्यावर बला*त्का*र होवू शकतो त्याच्या चाहत्यांनी केलेल्या ट्विटनुसार कदाचित तुमचा खून देखील होऊ शकतो, सामूहिक बला*त्का*र होऊ शकेल आणि आपल्या पालकांचा बळी घेतला जाऊ शकेल. हे आपल्या आयडलचे नाव अश्या वाईट प्रकारे खराब करीत आहे. मीरा चोप्राने यांबाबत पूर्ण तक्रार हैदराबाद पोलिसांकडे केली आहे.
अशावेळी मीरा चोप्राला गायिका चिन्मयी श्रीप्रदा यांचे सहकार्य लाभले आहे. तिला सुद्धा यापूर्वी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. श्रीप्रदाने मीरा चोप्राला या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे. मीरा चोप्रानेही हैदराबाद पोलिस आणि ट्विटरवर सोशल मीडियावरील ट्विटरवर ज्युनिअर एनटीआरच्या चाहत्यांवर कारवाई करण्याचे आवाहन बाकी लोकांना केले आहे.