‘या’ कारणामुळे महादेवाने केला होता गरीब सुदामाचा वध…

‘या’ कारणामुळे महादेवाने केला होता गरीब सुदामाचा वध…

पुराणांमध्ये, देव-देवतांच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध आहेत. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची कथा सगळीकडे प्रसिद्ध आहे.

आजही, त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देऊन नक्की मैत्री काय असते हे समजून सांगितले जाते. मात्र यात सुदामाच्या बाबतीत, एक असे रहस्य आहे जे अजून कुणालाही माहीत नाही. कृष्णलीलाच्या आधीही सुदामाचा उल्लेख बऱ्याच पुराणांमध्ये होतो. असं सांगितलं जातं की, राक्षस शंखचूरचा पुनर्जन्म सुदामा म्हणून झाला.

स्वर्गातील खास भाग, गोलोक याठिकाणी सुदामा आणि विराजा हे दोघे राहत होते. विराजाला कृष्णावर प्रेम होते, मात्र तरीही सुदामाने देखील वीराजा वर प्रेम करण्याची चूक केली. ज्यावेळी विराजा आणि कृष्ण एकमेकांच्या प्रेमामध्ये लिन होते, त्यावेळी स्वतः राधा तिथे प्रकट झाली. आणि तिने विराजाला गोलोक वरून, पृथ्वीवर वास करण्याचा शाप दिला.

त्याचवेळी, तुला सर्व माहीत असताना देखील मला अंधारात ठेवले म्हणून सुदामाला देखील राधाने शाप दिला. त्यामुळेच सुदामाला गोलोक वरून पृथ्वीवर यावे लागले, अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. राक्षसराज दंभ यांच्या इथे शंखचूरच्या रूपात सुदामाचा जन्म झाला आणि राजाचा धर्मध्वज यांच्या इथे तुलसीच्या रुपात विराजाचा जन्म झाला.

असं सांगितलं जातं की, शंखचूरला ब्रम्ह वरदान मिळाले होते. शंखजूरच्या रक्षणाकरिता, ब्रम्हाने त्याला एक कवच दिले होते. जोपर्यंत तुलसी तुझ्यावर विश्वास करत राहील, तिची साथ राहील, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकणार नाही, असे वरदान त्याला मिळाले होते.त्याने तुळशीसोबत विवाह केला. कालांतराने त्याने, तिन्ही लोकांवर आपले राज्य प्रस्थापित केले.

मात्र राज्य मिळताच शंखचूरने अत्याचार सुरू केला. त्यामुळे त्याच्या अ’त्याचा’राने परे’शान होऊन सर्व देवांनी ब्रम्हाकडे धाव घेतली. त्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णूकडे जाण्याचा सल्ला त्यांना दिला. भगवान विष्णूंनी देखील, सर्व देवतांना महादेवा कडे जाण्याचा सल्ला दिला. देवांनी महादेवाकडे पोहोचण्यापूर्वीच, शंखचूरने आपल्या अहं’कारामध्ये महादेवाला युद्धाचे आव्हान देऊन टाकले.

तुलसीच्या पतिव्रता आणि विश्वासामुळे शंखचूरला हरवणे अशक्य होते. त्यावेळी, भगवान विष्णूने शंखचूरचे रूप घेऊन तुलसी सोबत संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे तिचे पातिव्रत्य खंडित झाले आणि शंखचूरचा वध शक्य झाला. याच शंखचूरचा पुनर्जन्म सुदामाच्या रूपात झाला. आपले पातिव्रत्य भंग झाल्यामुळे, तिने विष्णूला दगडाचे बनण्याचा शाप दिला.

आपले पातिव्रत्य भंग झाले म्हणून, तुलसी प्रचंड दुखी झाली आणि अग्नी प्रवेश करण्याचा तिने निर्णय घेतला. तिच्या या पतिव्रता आणि भक्तीने प्रभावित होऊन, महादेवाने स्वतः प्रकट होऊन तिला वरदान मागण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी पाषाणाच्या रूपात भगवान विष्णू जर राहिले तर प्रकृती आणि सृष्टीचे किती नुकसान होईल हे देखील दिला समजून सांगितले.

त्यावेळी तिने आपले भंग झालेले पातिव्रत्य परत महादेवाकडे मागितले. आज पासून, तू सर्वात पवित्र समजली जाशील आणि सर्व पतिव्रता स्त्री केवळ तुझी अर्चना करून पत्नीव्रत काय असते हे समजतील, असा वरदान महादेवाने तिला दिला. त्यासोबतच, तू नेहमीच विष्णुप्रिया बनून राहशील, असे वरदान देखील महादेवाने तिला दिला. जिथे-जिथे तुळशीची पूजा होईल, तिथे-तिथे शालीग्रामच्या रूपात विष्णूची देखील पूजा केली जाईल; असे महादेव म्हणाले.

त्यामुळेच तुलसी आणि शालिग्राम या दोघांची सोबत पूजा करण्याची प्रथा आहे. शंखचूरचा वध करताना भगवान विष्णूने अधर्म केला होता. त्यावेळी तो महत्वाचा असला तरीही, तो अधर्मच होता. म्हणून, भगवान विष्णूने कृष्णाच्या रुपात शंखचूरने पुनर्जन्म घेतलेल्या सुदामाचे पाय धुवून केलेल्या अधर्माचे प्रायश्चित्त केले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *