या कारणामुळे तुमची आवडती मयंती लँगर यावेळी अँकरिंग करत नाहीये, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल…

क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलला नुकतेच सुरु झाले आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटर आणि पंचांची महत्वाची भूमिका असते पण जेव्हा खेळ थांबतो तेव्हा अँकरही या मध्ये मोठे योगदान देतात. आज आम्ही तुम्हाला आयपीएलच्या सर्वात सुंदर महिला अँकरबद्दल सांगत आहोत जिच्या सौंदर्याने सर्वांनाचा वेड लावले आहे.
मयंती लँगर हे आयपीएलमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. गेली अनेक वर्षे ती आयपीएलमध्ये अँकरिंग करताना दिसत आहे आपल्या सौंदर्यामुळे तिने सर्वानाच भुरळ घातली आहे आणि ती प्रसिद्ध क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी देखील आहे. पण यावेळी महिला अँकर मयंती लँगर या पॅनेलचा भाग नाही. मयंतीची गणना भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय महिला अँकरमध्ये केली जाते. यावर्षी आयपीएल अँकर पॅनेलची ती सदस्य का नाही, याविषयी क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे.
खरे तर मयंतीने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. मयन्तीने ट्विटरवर स्टुअर्ट बिन्नी आणि तिच्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोवर मयंतीने एक मेसेजही लिहिला आहे ती लिहते की तर तुमच्यातील काही मोजकेचांना कळू शकले आणि बाकीचे अंदाज करत राहिले आहेत की मी यावेळी का दिसत नाहीये तर मी आता आई झाली आहे. त्यामुळे मी विश्रांती घ्याचे ठरवले व माझा सर्व वेळ माझ्या बाळाला द्यायचे ठरवले आहे.
पुढे ती म्हणते की स्टार स्पोर्ट्सने मला मोठ्या कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी दिली. जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्यांनी मला साथ दिली. मी गर्भवती असताना, त्यांनी बरीच समायोजने केली जेणेकरुन मी 20 आठवड्यांपर्यंत म्हणजे सुमारे पाच महिने आरामात काम करत राहीन. आणि जर आयपीएल त्यांच्या स्वतःच असते तर ते आता सुद्धा त्यांनी केले असते. मी आणि स्टुअर्ट एक महिन्यापूर्वी एका मुलाचे पालक बनले आहोत.
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू असणाऱ्या स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर गेल्या अनेक सिझन मध्ये आयपीएलमध्ये अँकरिंग करत असलेल्या मयंती यावर्षी आई झाल्याने घरी सर्वसाधारण प्रेक्षक म्हणून या स्पर्धेचा आनंद लुटवेल. पती स्टुअर्ट बिन्नीसोबत तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
तिने पुढे सर्वाना शुभेच्छा देखील दिल्या तिने लिहले की सर्व टीम, जती सप्रू, सुहेल चंदो, आकाश चोपडा, संजना गणेशन, डीन जोन्स, स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, संजोग गुप्ता आणि संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
त्यामुळे यंदाच्या हंगामात ती दिसणार नसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण मयंकाने याबाबत खुलासा केला आहे. मागच्या वर्षी मयंका चांगलीच ट्रोल झाली होती, तिचा पती स्टुअर्ट बिन्नीच्या खराब खेळीमुळे लोकांनी तीला ट्रोल केले होते पण यावर मयंकाने लोकांना चोख प्रत्युत्तर दिले होते.
तिने म्हणले होते की मी वयाच्या १८ व्या वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे मी श्रीमंत पुरूषाच्या शोधात होते, असा आ*रोप करणाऱयांनी आधी स्वत:कडे पाहायले हवे, असेही ती पुढे म्हणाली. मयंतीने स्टुअर्ट आणि तिच्यावर विनोद करणाऱया लोकांना दिलेले प्रत्युत्तर तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केले होते.