या आहेत बॉलीवूडच्या सर्वात पहिल्या “बो*ल्ड अभिनेत्री”, यातील एकीचा धबधब्यातील सीन लोकांच्या अजूनही लक्षात आहे, जाणून घ्या यांबद्दल..

या आहेत बॉलीवूडच्या सर्वात पहिल्या “बो*ल्ड अभिनेत्री”, यातील एकीचा धबधब्यातील सीन लोकांच्या अजूनही लक्षात आहे, जाणून घ्या यांबद्दल..

असे म्हणतात की बॉलिवूड अभिनेत्रींची फिल्मी करिअर खूपच लहान असते. कालांतराने, सुंदर चेहरे असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रींचे रूप देखील बदलले आहे. पण त्यांनी केलेले पात्र आजही सर्वाना आठवतात. हिंदी सिनेमात अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या काळात अनेक बो*ल्ड पात्र साकारले आहे, चला तर मग अशा अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेऊया.

१. सिमी गैरेवाल चित्रपट मेरा नाम जोकर:- राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटात ऋषी कपूरने राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका निभावली होती. चित्रपटामध्ये एक सीन होता जिथे एक शिक्षिका कपडे बदलत असते आणि ऋषी कपूर तिला गुपचूप पाहत असतो. यामध्ये शिक्षिकेची भूमिका सिमी गैरेवाल यांनी केली होती.  ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गैरेवाल म्हणाल्या, एका सामर्थ्यवान व्यक्तीने तिचे करियर संपवण्याचा करण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु ती काहीच न बोलता शांत राहिली.

२. वैजंती माला चित्रपट संगम:- राज कपूर यांच्या संगम या चित्रपटात वैजंती माला बो*ल्ड स्टाईलमध्ये दिसली होती. वैजंती मालाने प्रथमच या चित्रपटात बिकिनी घातली होती. पाण्याखालचा एक सीन खूप प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दक्षिणमधील सुंदरी म्हणून ओळखली जाणारी वैजंती माला होती.

हिंदी चित्रपटांत अव्वल स्थान मिळविणे फार कठीण आहे. आजच्या काळात आणि यापूर्वीही खूप स्पर्धा होती त्याकाळातही अभिनेत्यांना त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची स्पर्धा असायची. अशा परिस्थितीत या अभिनेत्रींनी स्वत: ला चित्रपटांमध्ये यशस्वी बनविणे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत येणे खूपच कठीण होते आणि जेव्हा साउथ मधील या अभिनेत्रीने येऊन हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची वेळ येते तेव्हा ते आणखी कठीण होते. साउथ च्या सिनेमातून हिंदी सिनेमामध्ये यशस्वी झालेल्या अभिनेत्रींमध्ये वैजयंती मालाचे नाव प्रथम येते. वैजंती माला तिच्या अभिनयाने आणि कलेच्या जोरावर हे करून दाखवले आहे ज्यावर आजच्या नायिका स्वत: ला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. शास्त्रीय नृत्याच्या प्रतिमेसह वैजयंतीमाला हिने हिंदी चित्रपटांमध्ये नृत्याला महत्त्व आणून दिले होते.

३. झीनत अमान चित्रपट सत्यम शिवम सुंदरम:- झीनत अमान ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मॉडेल आणि सौंदर्य राणी म्हणून ओळखली जाणारी जी १९७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधील कामासाठी प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने मिस एशिया पॅसिफिक १९७० चे विजेतेपद जिंकले आहे. हे विजेतेपद जिंकणारी ती दक्षिण आशियाची पहिली महिला आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीने आधुनिक लूकची ओळख करून देणारी परविन बाबी यांच्यासह झीनत अमान या दोघांना तिच्या बो*ल्ड प्रतिमेमुळे कायमस्वरुपी प्रभाव पाडण्याचे श्रेय दिले गेले.

१९७८ साली आलेला राज कपूर यांचा सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपटही खूप बोल्ड होता. या चित्रपटात झीनत अमानने सुरुवातीपासून शेवटपर्यंत बो*ल्ड कपडे परिधान केले आणि अनेक सीन दिले. विशेषत: शशी कपूरसोबत झीनत अमानने चित्रित केलेला टायटल ट्रॅक चर्चेत होता. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये झीनत आणि शशी कपूर यांनी बरेच बो*ल्ड सीन दिले होते.

४. मंदाकिनी चित्रपट राम तेरी गंगा मैली:- मंदाकिनीने राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून प्रवेश केला होता. मंदाकिनीने या चित्रपटात जबरदस्त बो*ल्ड सीन दिले होते, विशेषत धबधब्याचा सीन. या सीनमध्ये मंदाकिनीने फक्त पांढरी साडी घातली होती ज्यामध्ये ती धबधब्याखाली उभी राहणार होती. या सीनसाठी मंदाकिनी अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *