Home » .. म्हणून आमिर खानने रेखा सोबत कधीच काम केले नाही, कारण वाचून थक्क व्हाल
बॉलीवूड

.. म्हणून आमिर खानने रेखा सोबत कधीच काम केले नाही, कारण वाचून थक्क व्हाल

बॉलिवूडची दिवा रेखा यांच्यासोबत काम करण्याची अनेक अभिनेत्यांची इच्छा असते. बॉलिवूडमधील आजच्या आघाडीच्या अनेक अभिनेत्यांनी त्यांच्यासोबत विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का, रेखा आणि आमिर खान यांनी कधीच कोणत्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले नाही.

आमिर खान गेली अनेक वर्षं इंडस्ट्रीचा भाग असून त्याने अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण रेखा यांच्यासोबत तो कधीच कोणत्या चित्रपटात झळकला नाही. आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांच्या लॉकेट या चित्रपटात रेखा यांनी काम केले होते.

त्याच चित्रपटानंतर रेखा यांच्यासोबत कधीच काम करायचे नाही असे आमिरने ठरवले होते असे म्हटले जाते. रेखा यांनी ताहिर यांच्या लॉकेट या चित्रपटात काम केले होते, त्यावेळी आमिर अनेकवेळा चित्रपटाच्या सेटवर यायचा आणि रेखा यांची वागणूक सेटवर कशी असते हे त्याने पाहिले होते.

त्यांची वागणूक त्याला तितकीशी पसंत पडली नव्हती. कामाबद्दल त्यांचा असलेला अ‍ॅप्रोच त्याला आवडला नव्हता आणि त्याचमुळे रेखा यांच्यासोबत काम करायचे नाही असे आमिरने त्यावेळीच ठरवले होते असे म्हटले जाते.

रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने ऐंशी आणि नव्वदीचा काळ अक्षरशः गाजवला. त्यांनी या काळात एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते. त्यामुळे रेखा यांच्यासोबत काम न करण्याचे आमिरचे हे कारण नसावे असे देखील अनेकांना वाटते.

आमिरला बहुधा त्यांच्यासोबत काम करण्यासाठी एखादी चांगली पटकथा मिळाली नसेल असा देखील अंदाज काही वेळा लावला जातो. तसेच रेखा यांच्या एका चित्रपटात आमिर झळकणार होता. पण चित्रपटाचे बजेट कमी असल्याने आमिर त्या चित्रपटाचा भाग बनू शकला नाही असे देखील म्हटले जाते.

लॉकेट या चित्रपटाची निर्मिती आमिरचे वडील ताहिर हुसैन यांनी केली होती तर या चित्रपटात रेखा यांच्यासोबत जितेंद्र मुख्य भूमिकेत होते.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment