मृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा आपल्या मृत शरीराजवळ परत का येते?

जो कोणी या पृथ्वीवर जन्मला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. असा एक पण व्यक्ती या जगात नाही की तो अमर आहे किंवा त्याचा मृत्यू झाला नाही. जसा जन्म होतो तसा मृत्यू देखील अटळ आहे. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहोत त्यावरून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
या प्रश्नाचे उत्तर जवळजवळ सर्व लोक जाणून घेण्यास उत्सुक आहे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात एक कोडे राहिला आहे. आज आम्ही तुम्हाला 24 तासांनंतर आत्मा आपल्या मृत शरीरा जवळ परत का येते. तर यावर आज आपण प्रकाश टाकणारा आहोत.
आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ती गरुड पुराणातील आहे. गरुड पुराणात नमूद केलेले आढळले आहे की, लोक मरणानंतर आपल्या आयुष्यात जे काही कर्म करतात तसे त्यांना फळ मिळते असे आपण ऐकले आहे आणि ते खरं आहे.
गरुड पुराणानुसार मृत्यू झाल्यावर आपल्या आत्माच काय होत त्यात या बद्दल लिहिले आहे, गरुड पुराणानुसार, मृत्यूच्या वेळी २ यम दूत येतात, जे चांगले काम करतात, त्यांना आदरपूर्वक नेतात आणि ज्यानी वाईट कर्म केलं आहे त्यांच्यावर अत्याचार करतात आणि त्यांना तसच घेऊन जातात
हे दोन यम दूत हा आत्मा यमासमोर ठेवतात आणि 24 तास तिथेच ठेवतात, जिथे त्यांच्या आयुष्याचा पूर्ण लेखाजोखा दाखविला जातो. आणि 24 तासांनंतर ते दूत आपली आत्मा परत पृथ्वीवर 13 दिवसांसाठी सोडून जातात. त्यानंतर त्यांची पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना ते यम दूत वर घेऊन जातात.
ही सगळी माहिती गरुड पुराणात आढळलेली आहे. आणि त्यानुसाच सगळे घडत आहे पुढे देखील त्यानुसारच घडणार आहे.