मुली जोडीदार निवडताना मुलांमधील या 5 गुणांना अधिक महत्व देतात, जाणून घ्या या 5 गुणांबद्दल ज्यामुळे मुली होकार देतात..

मुली जोडीदार निवडताना मुलांमधील या 5 गुणांना अधिक महत्व देतात, जाणून घ्या या 5 गुणांबद्दल ज्यामुळे मुली होकार देतात..

मुली आपल्या आई वडिलांची परिस्थिती कितीही बिकट असली तरीही कायम एखाद्या परीसारखंच आयुष्य जगत असतात. म्हणजे आपल्या मुलीच्या सुखासाठी आई वडिल कायमच झटत असतात त्यामुळे सहाजिकच आपल्या वडिलांमधील काही गुण आपल्या जोडीदारातही असाव्यात आणि लग्नाआधी जसे आपण आरामात, सुखात, लाडात आयुष्य जगतोय तसेच लग्नानंतरही जगावं असं प्रत्येक मुलीला वाटत असते.

पण मुलांमधील असा काही सवयी ज्या या जगातील प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदारात हव्या असतात. म्हणजे जोडीदाराबाबत मुलींच्या या काही आवडी निवडी अगदी सेम असतात. हे गुण दिसणे, पैसा यापलिकडे जाऊन व्यक्तिमत्वाशी जोडलेली असते. प्रत्येक चांगल्या संस्कारात वाढलेल्या मुलामध्ये या गोष्टी असतातच त्यामुळे या गोष्टीवरुन आपल्या जोडीदाराची पारख करणे मुलींना सोपे जाते.

१. प्रत्येकाचा आदर करणारा:- बरीच लोक म्हणतात नात्यात प्रेम सर्वात जास्त महत्त्वाचं असतं पण खरं तर नात्यात प्रेमापेक्षाही आदर सर्वात वरच्या स्थानी असतो. कोणताही मुलगा आपल्या प्रेयसीला कितीही प्रेम करो, तिचे लाड करो अथवा तिच्यावर पैसा उधळो पण जोपर्यंत तो तिला आदर देत नाही तोपर्यंत कोणतीच मुलगी त्याच्यासोबत राहणार नाही.

पुरुषप्रधान समाजात राहताना बहुतेक वेळा मुलींना अनेक नकारात्मक आणि भुरसटलेल्या विचारांचा सामना करावा लागतो त्यामध्ये जोडीदारच एखाद्या मुलीला असा मिळाला जो तिच्या कामाचा, विचारांचा किंवा तिचा आदर करत नाही तर ती त्याच्यासोबत आयुष्य जगणे कठीण होते. त्यामुळे प्रत्येक मुलगी सर्वात आधी आपला जोडीदार आपल्याला किती आदर देतो हेच पाहते आणि मगच निर्णय घेते.

२. सामंजस्य स्वभाव:- जर हा समजुतदारपणाच नात्यात नसेल तर गैरसमजापासून न जाणो कितीतरी नकारात्मक गोष्टी नात्यात येऊ पाहतील आणि आपले नातेच उद्धवस्त करतील. जर समजुतदार मुलगा जोडीदार असेल तर त्या मुलीला कोणताच प्रॉब्लेम किंवा विचार शेअर करताना संकोच वाटणार नाही. समजुतदारपणा नात्यातील संवाद चांगला ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे जोडीदारासोबत भावनात्मिक नाते मजबूत होते.

३. गृहीत धरणे:- नातं तोडण्यास सर्वात जास्त जबाबदार कोणती गोष्ट असेल तर ती असते आपल्या जोडीदाराला गृहित धरणं. एकत्र वेळ घालवण्यासाठी वेळ न काढणे, मेसेज किंवा कॉलचा तासनतास रिप्लाय न करणे, डेटवर जाण्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाण्यात रस न दाखवणे. प्रेयसीच्या आयुष्यात काय सुरु आहे यामध्ये रस न दाखवणे यासारख्या गोष्टी हे दाखवून देतात की तुम्ही जोडीदारास गृहित धरता आहात. जेव्हा जोडीदार असं वागतो तेव्हा एकमेकांवर कितीही प्रेम का असेना पण नातं तुटण्याच्या मार्गावर जाते.

४. काळजी करणारा:- सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो व्यक्ती खरेच आपल्या जोडीदाराची मर्यादेपलीकडे जाऊन काळजी घेतो तो कधीच त्या व्यक्तीला दुखावणार नाही. असं वागणं मुलींना सुरक्षित वाटण्यासही उपयोगी पडते. आपली काळजी करणारा, सतत सोबत असणारा, पडल्यावर हात देऊन उठवणारा आणि रडताना अलगद हसवणारा जोडीदार कायमच मुलीना जास्त प्रिय वाटतो.

५. दयाळू असणारा:- प्रत्येकालाच दयाळू जोडीदार हवा असतो. कारण ब-याचदा दयाळू असणारा व्यक्ती काळजी घेणारा, समजुतदार आणि आदर देणारा असतोच. व्यक्ती दयाळू तेव्हाच असू शकतो जेव्हा तो एखाद्याच्या भावनांचा विचार करुन त्याची मदत करत असतो, तो त्याच्या बाजूने विचार करत असतो आणि हे दोन्ही भाव त्या व्यक्तीला एक सर्वोत्तम व्यक्तिमत्व बनवतात.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *