बॉलीवूड मध्ये येण्याआधी “विकत होती लॉटरी तिकीट”, पैसे साठवून आली भारतात, आता बनली टॉप प्रसिद्ध अभिनेत्री “जाणून घ्या”..

बॉलीवूड मध्ये येण्याआधी “विकत होती लॉटरी तिकीट”, पैसे साठवून आली भारतात, आता बनली टॉप प्रसिद्ध अभिनेत्री “जाणून घ्या”..

दिलबर दिलबर गाण्यात तिच्या डान्समुळे प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री नोरा फतेही हिचे नावही तुम्ही ऐकले असेलच. बर्‍याच लोकांना असे वाटते की नोरा फतेही भारताची आहे पण तसे नाही. नोरा फतेही ही मूळ कॅनडाची आहे. तीचे बालपण कॅनडामध्ये गेले आहे. तिने अनेक वर्षे कॅनडामध्ये घालविली आहेत आणि याबद्दल बर्‍याच लोकांना माहिती नाही.

वर्ष १९९२ मध्ये कॅनडामध्ये जन्मलेल्या नोरा फतेहीला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते पण त्यासाठी योग्य उद्योगाची गरज होती, त्यामुळे ती अभिनेत्री होण्याच्या स्वप्नासह भारतात आली. सुरुवातीला जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला तीला कोणतेही काम मिळाले नाही किंवा कोणीही काम द्यायला तयार होत नव्हते जेणेकरून ती आपली उपजीविका चालवू शकेल. हिंदी सिनेमाविश्वात तिने स्वत: ला कसे पुढे आणले जाणून घ्या.

भारतात येण्यापूर्वी या अभिनेत्रीने कॅनडामध्ये बरीच छोटी छोटी कामे केली होती. ती कॅनडामध्ये असताना तिने  लॉटरीची तिकिटेही विकली आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कॉल सेंटर कंपनीत ती लोकांना लॉटरीची तिकिटे विकत असे, त्या बदल्यात तिला कमिशन तसेच पगारही मिळायचा आणि तेथून पैसे साठवून ती नंतर भारतात आली.

तसेच नोरा फतेहीप्रमाणेच इतरही अनेक मुली इतर देशातून नाव कमावण्यासाठी भारतात येतात पण प्रत्येकाला यश मिळत नाही. नोरा फतेही लकी आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आज संपूर्ण जग नोराला एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि प्रतिभावान डान्सर  म्हणून ओळखते. तिने केवळ भारतातच आपली वेगळी ओळख निर्माण केली नाही तर संपूर्ण जगात तिने स्वताची ओळख निर्माण केली आहे. आता लोक तिच्यासाठी वेडे आहेत.

डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही सांगते की ती जेव्हा कॅनडाहून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. तिने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. नोरा म्हणाली की मी फक्त 5000 रुपये घेऊन भारतात आली होते. पण मी ज्या एजन्सीमध्ये काम करीत होतो त्यातून मला दर आठवड्याला ३००० रुपये मिळत होते. पण या रकमेत माझ्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे खूप कठीण होते. पण मी सर्व काही स्मार्ट पणे हाताळले आणि आठवड्याच्या शेवटी पैसे शिल्लक राहण्यासाठी प्रयन्त केले.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या धमाकेदार डान्ससाठी परिचित आहे. बिग बॉस नंतर सत्यमेव जयते चित्रपटातील दिलबर या गाण्यानंतर नोरा फतेहीने केवळ एक अद्वितीय ओळख निर्माण केली नाही तर लोकांची मनेही जिंकली आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या साकी-साकी गाण्यात नोरा फतेहीने तिच्या डान्सने जोरदार दणका दिला होता.

नोरा फतेहीने सांगितले की भारतात आल्यानंतर तिला अनेक त्रास व अडचणीतून जावे लागले. मिडियाशी संवाद साधताना ती म्हणाली की भारतातील परदेशी लोकांचे आयुष्य खूप कठीण आहे. आम्ही बर्‍याच गोष्टींमधून जातो ज्याबद्दल सामान्य लोकांना माहिती नसते. तिच्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल बोलताना नोरा फतेही म्हणाली की माझ्या कारकीर्दीच्या सुरूवातीला एका कास्टिंग एजंटने मला म्हणले आम्हाला इथे तुमची गरज नाही. तू परत जा. त्याने म्हणलेली ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. मला त्यावेळी खूप वाईट वाटले होते.

 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *