बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहेत या गायिका, यातील नंबर 3 तर तुमची फेव्हरेट आहे, बघा फोटोज…

बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहेत या गायिका, यातील नंबर 3 तर तुमची फेव्हरेट आहे, बघा फोटोज…

बॉलिवूडमध्ये सौंदर्यांची खाण आहे. एकाहून एक सुंदर अभिनेत्रींना आपण नेहमीच पडद्यावर बघत असतो. मात्र बॉलिवूडमध्ये पडद्यामागेही सौंदर्याची खाण आहे. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडमधील आजच्या पिढीतल्या गायिकांविषयी. त्यांच्या समधुर आवाजाची मोहिनी रसिकांवर आहे. या गायिकांचा आवाज जेवढा सुमधूर आहे तितक्याच त्या दिसायलासुद्धा सुंदर आहेत.

आजच्या दिवसात बॉलिवूडमध्ये अशा काही गायिका आहेत ज्या अभिनेत्रींपेक्षा देखील सुंदर दिसतात. तरुणाईमध्ये या गायिकांची कमालीची क्रेझ निर्माण आहे. अवघ्या काही वर्षात या गायिकांनी आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.

आज आम्ही तुमची भेट अशाच काही सुंदर गायिकांशी घडवून देतोय. ज्या गोड आवाजाबरोबरच सौंदर्याच्यासुद्धा मालकीण आहेत. चला तर जाणून घेवूयात.

१. ध्वनि भानुशाली:- मुंबईत जन्मलेली आणि देहरादूनमध्ये शिकलेली ध्वनि तिच्या वास्ते या गाण्याने खूप प्रसिद्ध झाली. तिने बॉलिवूडमधील अनेक अल्बम तसेच किन्ना सोना तसेच दिलबर सारखे अनेक हि*ट गाणे गायले आहे. ही गाणी प्रेक्षकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली.

२.मोनाली ठाकूर:- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेती मोनाली देखील आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहे. तिने ये मोह मोह के धागे संवार लूं बद्री की दुल्हनिया आदी लोकप्रिय गाणी गायली आहेत.

३. शर्ली सेतिया : शर्लीला तर आपण ओळखतच असाल, शर्ली तरुणांमध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. यु ट्यूब सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी क्यूट चेहऱ्या ची शर्ली सेतिया आज बॉलिवूडमधील सर्वात सुंदर गायकांपैकी एक आहे. यु ट्यूबपासून सुरु झालेला तिचा प्रवास आज बॉलिवूड गायिकेपर्यंत येऊन ठेपला आहे.

मुळ न्यूझीलंडची असणारी शर्ली आपल्या पॉप गाण्यांसाठी ओळखली जाते. शर्लीचे यु ट्यूबवर कोट्यवधी सब्सक्राइबर आहेत. तिने आपला आवाज ए जेंटलमॅन, पैसेंजर्स सारख्या गाण्यांना दिला आहे.

४. नीती मोहन:- प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये गाणाऱ्या नीतीने तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, मराठी, पंजाबी आणि इंग्रजी भाषेतही गाणी गायली आहे. ती चॅनल V च्या रियालिटी शो पॉपस्टारची विजेती होती. तिने नैनों वाले ने, वफा ने बेवफाई, पिया मोरे, सपना साया, आणखी बऱ्याच गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

५.रुपाली जग्गा:- रुपाली बॉलिवूडमधील अतिशय हुशार गायिका आहे. सारेगामा या रियालिटी शोची ती फायनलिस्ट आहे. 2007 मध्ये ती साधना वाहिनीवरील भजन सम्राटची विजेती होती. 2017 मध्ये तिला भारत की शकीरा इन सारेगममापा ही पदवी मिळाली. तिने बॉलिवूडमध्ये पार्श्वगायका म्हणून देखील पदार्पण केले आहे.

६.सुनंदा शर्मा:- सुनंदा एक गायिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. मूळची पंजाबी असणाऱ्या सुनंदाने बिली अख पासून आपले करिअर तर तेरे नाल नाचना गाण्यातून बॉलिवूड पदार्पण केले. तिने देखील यु ट्यूबपासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज ती आघाडीची गायिका आहे.

कशी वाटली आजची माहिती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.

 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *