बॉलिवूडच्या ‘या’ सात खतरनाक खलनायकांच्या बायका बघून आश्चर्य चकित व्हाल, एकाने तर शेजारचीला पळऊन केले होते लग्न

बॉलिवूडच्या ‘या’ सात खतरनाक खलनायकांच्या बायका बघून आश्चर्य चकित व्हाल, एकाने तर शेजारचीला पळऊन केले होते लग्न

हिंदी चित्रपटसृष्टीतील असेही काही कलाकार आहेत जे आपल्या खलनायकी पात्रांसाठी अनेक चित्रपटांमध्ये नेहमीच ओळखले जातात. चित्रपटात अभिनय करण्याच्या बाबतीत हे कलाकार बर्‍याचदा मुळ भूमिकेतील नायकाला देखील मागे टाकतात.

जसे बॉलीवुड मधील नायक त्यांचे वैयक्तिक आयुष्या सबंधित चर्चेत असतात तसे बॉलिवूडमधील खलनायकही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच चर्चेत असतात, पण बॉलिवूड सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्यांच्या
बायकांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ..?

बॉलीवुड मधील अभिनेत्यांच्या बायकांची जशी सर्वांना माहिती असते तशीच खलनायकांचे बायकांची माहिती करून घेण्याची देखील बऱ्याच जणांना उस्तुकता असते. अभिनेत्यांच्या बायकांपेक्षा खलनायकाच्या बायकांची चर्चा फार कमी होत असते. तर आज आपण या लेखाद्वारे बघणार आहोत की खलनायकाच्या बायका देखील अभिनेत्यांच्या बायकांपेक्षा दिसायला कमी नसतात.

शिवांगी कपूर : बॉलिवूडमधील ख्यातनाम खलनायकांपैकी एक अभिनेता शक्ती कपूरची ती पत्नी आहे. शिवांगी कपूर बॉलिवूडची सुंदर आणि दिग्गज अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण आहे. शक्ती कपूर आणि शिवांगी यांनी 1982 साली लग्न केले.

कशिश : अभिनेता गुलशन ग्रोव्हर आणि त्याच्या अभिनयाची माहिती सर्वांना आहे. गुलशनने दोन विवाहसोहळे केले होते, परंतु त्याचे दोन्ही विवाह फार काळ टिकू शकले नाहीत. ज्यानंतर तो आता अविवाहित आहे. गुलशन ग्रोव्हरच्या दुसर्‍या पत्नीचे नाव कशिश होते, जिच्या सोबत त्याने 2001 मध्ये लग्न केले होते, पण कशिश आणि गुलशन ग्रोव्हरने एका वर्षानंतर घटस्फोट घेतला.

गवा : ही ज्येष्ठ अभिनेता डॅनी डेन्झोंगपाची पत्नी आहे. डॅनी डेन्झोंगपाने ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘सनम बेवफा’, ‘खुदा गवाह’, ‘घातक’, ‘बेबी’ यासह जवळजवळ 190 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातील बहुतेक चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाची भूमिका केली आहे. 1990 साली डॅनी डेन्झोंगपाने गवाशी लग्न केले.

किरण खेर :-

ही बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. 1985 मध्ये तिने अभिनेता अनुपम खेरशी लग्न केले. अनुपम खेरने चित्रपटांमधील आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने बर्‍याच चित्रपटांमध्ये डेंजरस व्हिलनची भूमिका केली होती.

पोनी राज : ती दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध खलनायक प्रकाश राज यांची पत्नी आहे. ‘सिंघम’, ‘वांटेड’ आणि ‘दबंग 2’ या बॉलिवूड चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रकाश राजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रकाश राज आणि पोनी यांचे वय दरम्यान 12 वर्षांचे अंतर आहे. 2010 साली या दोघांचे लग्न झाले.

रेणुका शहाणे : ही बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. रेणुका शहाणेने ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणाशी लग्न केले आहे. आशुतोष राणाने बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये खलनायक बनून मोठ्या पडद्यावर आपली खास छाप सोडली आहे.

नीलम सिंग : ही मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अभिनेता रोनित रॉयची पत्नी आहे. रोनित रॉय यांनी बर्‍याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून बरेच चर्चेत राहिले आहे. रोनित रॉय आणि नीलम सिंग यांनी 2003 साली लग्न केले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *