बेडरूम मध्ये झोपलेल्या दोन चिमुकल्यांना एकट बघून कु’त्र्याने केले असे काही की, CCTV फुटेज बघून चकित व्हाल…

बेडरूम मध्ये झोपलेल्या दोन चिमुकल्यांना एकट बघून कु’त्र्याने केले असे काही की, CCTV फुटेज बघून चकित व्हाल…

प्राणी म्हणलं की, प्रत्येकाला आपल्या आपल्या आवडीचे प्राणी समोर येतात. कधी ते पाळीव प्राणी असतात तर कधी, ते वि’ध्वंस’क आणि जंगलातील प्राणी सुद्धा असतात. वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळे प्राणी आवडतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्राणी पाळायला आवडतात.

कोणी मांजरांना पाळत तर, कोणी पक्षी देखील पाळतो, काही लोकं सिंह आणि जंगली कु’त्र्यांना देखील पाळतात. कोणता प्राणी पाळायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, त्यापैकी कुत्रा हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा पाळीवप्राणी आहे. पूर्वापार कुत्रा,अनेक जण पाळतात. इमानदार कुत्र्याच्या वेगवेगळ्या कथा आपण आपल्या आसपास ऐकल्या आणि पहिल्या आहेत.

फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इंडीड, ही म्हण कोणत्याही कुत्र्याच्या बाबतीत हुबेहूब लागू होते. एक वेळ तुमचा जवळचा मित्र तुमची साथ सोडेल, मात्र तुमचा पाळलेला कुत्रा तुमची साथ कधीच सोडणार नाही. म्हणून कुत्र्याला सर्वात उत्तम मित्र म्हणले जाते, असे अनेक उदाहरण आपण आपल्या आसपास पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वी, जेव्हा मुंबईमध्ये पूर आला होता तेव्हा आपल्या मालकाजवळ पोहोचण्यासाठी एका कुत्र्याने तब्बल दोन किलोमीटर प्रवास, पाण्यातून पोहून केला होता. त्याचा व्हीडियो सगळीकडेच वायरल झाला होता. यावरूनच कुत्र्याचे आपल्या मालकासाठी असलेल्या प्रामाणिकपणाचे धडे समजतात. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.

एक कुत्रा आपल्या मालकाच्या घरी त्यांच्या मुलासोबत असे काही करत आहे की, या व्हिडिओने सगळीकडेच चर्चा रंगवली आहे. सुरुवातीपासून सोबत असल्यावर लहान मुले देखील आपल्या घरातील कुत्र्याला भी’त नाहीत आणि कुत्रे देखील त्या मुलांची अत्यंत उत्तम प्रकारे काळजी घेतात, असे आपण खूप वेळा पाहिले आहे. आणि हेच या व्हिडिओमध्ये देखील बघायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये रात्रीची वेळ आहे आणि सगळीकडे अंधार आहे. घरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही सर्व घटना कैद झाली होती, आणि त्याचाच व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे. आपल्या मालकाची चिमुकले झोपलेली असताना त्यांची काळजी घेण्यासाठी कुत्रा वारंवार त्यांच्या रूम मध्ये जात होता. ती चिमुकली नक्की झोपी गेलेली आहेत ना याची खात्री करून घेत होता.

इतकेच काय तर एखाद्या काळजीवाहू आईप्रमाणे मुलांच्या अंगावरील ब्लॅंकेट बाजूला झाले तर ते देखील तो व्यवस्थित करत होता. हा सर्व प्रकार बघून सर्वजण त्या कुत्र्याचे चांगलेच कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं स्वतःच्या बेडवर झोपलेले आहेत. अचानकच त्यावेळी, एक कुत्रा त्यांच्या बेडरूम मध्ये येतो.

कुत्रा इतक्या हळूवार पावलांनी येतो कि, त्या मुलांची झोप अजिबात डिस्टर्ब होत नाही. त्यानंतर तो दुसऱ्या बेडरुममध्ये देखील जातो, तिथे सुद्धा मुले नीट झोपले आहेत की नाही हे काळजीने बघतो. मुले व्यवस्थित झोपलेली आहेत, हे बघून तो एका ठिकाणी शांत बसतो. हे सर्व बघून एक कुत्रा किती व्यवस्थित प्रकारे लहान मुलांची काळजी घेऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे, श्वानप्रेमींनी या व्हिडीओवर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव सुरू केला आहे.केली रोटेट या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याचे नाव किलिअन असे आहे. तो आपल्या मालकाच्या चिमुकल्या सोबत नेहमीच वेळ घालवत असतो आणि खेळताना त्यांची काळजी देखील घेतो, असे देखील या पोस्टमध्ये सांगितले आहे.

एखादी आई आपल्या मुलांची जशी काळजी घेते तसेच हा कुत्रा त्या मुलांची काळजी घेताना बघून अनेक श्वानप्रेमी इमोशनल सुद्धा झाले आहेत. या व्हिडिओने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *