बॉलीवूड

ना चित्रपट ना जाहिरात तरीही ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, तरी देखील जगतो अंबानी सारखे जीवन, पहा कसे…..

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांचा 3 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो तसेच तो 44 वर्षांचा झाला आहे. विवेकचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी हैदराबादमध्ये अभिनेता सुरेश ओबेरॉय यांचे घरात झाला आणि त्याच्या पालकांनी त्याचे नाव विवेकानंद ओबेरॉय ठेवले होते.

18 वर्षांपूर्वी बॉलीवुड मध्ये पदार्पण :-

बॉलीवुड चां प्रसिद्ध अभिनेता विवेकने 2002 मध्ये राम गोपाल वर्माच्या फिल्म कंपनीपासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचे बॉलिवुडमधील प्रवेशाने बॉलीवूडला चांगला अभिनेता मिळाला होता. दिसायला सर्वात सुंदर आणि हँडसम असा हा नेता प्रसिद्धीस पात्र असा ठरला. यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.

यानंतर तो रोड अणि दम या चित्रपटातही दिसला. या वर्षानंतर त्यांचा साथिया हा चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी देखील होती. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि तो तेव्हाच फेमस झाला असल्याचे सिद्ध झाले.

त्यानंतर विवेकने बरेचसे चित्रपटातून काम केलेले आहे. जसे की मस्ती, युवा, किसना: द वॉरियर पोएट, ओंमकारा, नक्शा, शूटआउट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, रक्त चरित्र, क्रिश 3, ग्रेट ग्रँड मस्ती, पीएम नरेंद्र मोदी आणि रुस्तम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला. आणि या सर्व चित्रपटातून विवेक ने खूप चांगली कामगिरी केली. त्यात त्याला चाहत्यांनी देखील खूप प्रतिसाद दिला. परंतु यानंतर सध्या विवेक बॉलीवुड मध्ये जास्त दिसत नाही. परंतु त्याची संपत्ती बघून सर्वजण चकित होत आहे.

विवेक एका प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे :-

विवेक केवळ अभिनेताच नाही तर तो प्रोडक्शन हाऊसचा मालकही आहे, ज्याचे नाव ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंट आहे. इतकेच नाही तर विवेक यांची स्वत: ची कंपनी कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड देखील आहे. सन 2016 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने महाराष्ट्रातील शाहपूर येथे परवडण्याजोगे हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू केले होते, त्याअंतर्गत 15 हजाराहून अधिक कुटुंबांना 7 लाख 90 हजार रुपये किंमतीला घरे द्यावी लागणार आहेत. हे जाणून घ्यावे की या प्रकल्पांतर्गत विवेकने 2017 साली छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांना महाराष्ट्रात ठाणे येथे 25 फ्लॅट देण्याचे ठरविले होते.

विवेक ओबेरॉयची संपत्ती इतकी कोटी आहे :-

मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार, विवेक ओबेरॉयची एकूण मालमत्ता सुमारे 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1 अब्ज 10 कोटींपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे जर आपण चित्रपटांबद्दल बोललो तर विवेक एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतात. अशी आहेत विवेक यांची संपत्ती.

त्यांनतर 29 ऑक्टोबर 2010 रोजी, विवेकने प्रियंका अल्वाशी लग्न केले होते, ज्यांना कर्नाटकचे मंत्री जीवाराव अल्वा यांची मुलगी प्रियंका सोबत बेंगलुरुमध्ये लग्न केले होते. या दोघांना दोन मुले आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close