तुमच्या ‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो ! आजच या सवयी सोडा…

तुमच्या ‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो ! आजच या सवयी सोडा…

सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटँक असू शकतो हे कुणाला खरे वाटत नाही.

हल्ली बदलती जीवनशैली आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच जास्त ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयाशी सं*बंधित आजार उद्भवत आहेत. जर तुम्हाला हृदयाशी सं*बंधित कोणत्याही प्रकारचा त्रास नको असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलण्याची गरज आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सवयींबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर तुम्हाला हृदयाशी सं*बंधित अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच ज्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल त्यांनी अजिबात धूम्रपान करू नये.

कारण एका अभ्यासात असे दिसून आले आहे की हृदयविकाराच्या झटक्यानंतर धूम्रपान करणार्‍यांना जीवाचा धोका जास्त असतो.जर आपल्याला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर त्यामुळे हृदयात ब्लॉकेजचा अडथळा निर्माण होऊ शकतो.

यामुळे रक्ताची गुठळी बनण्याची देखील शक्यता असते म्हणून आपण आपल्या शरीराचे वजन हे आपल्या वय आणि उंचीनुसार योग्य प्रमाणात ठेवा. यासाठी नियमित व्यायाम करून संतुलित आहार घ्यावा.

आपल्या शरीरास क्काय्म फिट ठेवण्यासाठी आणि हृदयाशी सं*बंधित आजारांपासून मुक्त होण्यासाठी आपण दररोज कमीत-कमी अर्धा तास चालणे आवश्यक आहे. तसेच आपल्या आहारात तंतुमय गोष्टींचा जास्त समावेश करा. जर आपण हे केले तर यामुळे हृदयविकाराचा त्रास नक्कीच कमी होईल.

अति कोलेस्ट्रॉलला आपल्या हृदयाच्या जवळ-जवळ अजिबात भटकू देऊ नका. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाशी सं*बंधित आजार होण्याचा धोका वाढतो, म्हणून आपण उच्च रक्तदाब आणि वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला लगेच नियंत्रित करा.

आपल्या शरीरातील हृदयनामक यंत्राला नेहमी व्यवस्थित कार्यरत ठेवल्यास आपल्याला कोणताच आजार किंवा अ*टॅक येणार नाही. रोज सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात आणि शुद्ध हवामानात ४५ मिनिटे चाला आणि हृदयविकार टाळा.

प्रत्येकाने आपल्या वयानुसार व्यायाम करावा. तुम्ही ६० वर्षांचे असाल तर ६० मिनिटे चाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालावे. चालताना अस्वस्थ वाटल्यास लगेच डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्यावी. बाहेरचे खाणे कमी करावे. बसल्या जागी हात-पाय हलवण्याचा व्यायाम करावा. जेवणात तेलाचे प्रमाण कमी करावे.

यासाठी आहारात योग्य बदल आणि नियमित व्यायाम केल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो. आपण जसजसे मोठे होत जातो, शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला की, हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. अशावेळी अचानक हृदय बंद पडते. याला हृदयविकारचा झटका आला असे म्हणले जाते.

शा*रीरिकदृष्ट्या तंदूरूस्त राहण्याने आपल्या हृदयाचे कार्य सुधारते. यामुळे सायकलिं*ग, चालणे, पळणे, पोहणे, व्यायाम, ट्रेडमिल आणि नियमित जॉगिंग करा. दररोज शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे कार्य योग्यपद्धतीने होते.

 

jaymaharashtra

One thought on “तुमच्या ‘या’ सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो ! आजच या सवयी सोडा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *